Ashutosh Rana : मोठ्या पडद्यावर अनेक चित्रपटांमधून लोकप्रिय भूमिका साकारणारे अभिनेते आशुतोष राणा (Ashutosh Rana) हे सध्या त्यांच्या रावणाच्या भूमिकेमुळे बरेच चर्चेत आलेत. गौरव भारद्वाज दिग्दर्शित 'हमारे राम' (Hamare Ram) हे नाटक सध्या रंगभूमीवर आलं आहे. दरम्यान या नाटकाच्या माध्यमातून आशुतोष राणा यांनी तब्बल 22 वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे. इतक्या वर्षांनी रंगभूमीवर परत्यावर आशुतोष राणा हे स्वत: भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 


आशुतोष राणा यांनी 22 वर्षांपूर्वी विजय मेहता यांच्यासोबत पुरुष या मराठी नाटकात काम केलं होतं. या नाटकाची निर्मिती नाना पाटेकर यांनी केली होती. नवभारत टाईम्ससोबत संवाद साधताना आशुतोष राणा यांनी आनंद व्यक्त करताना म्हटलं की, 22 वर्षांनी रंगभूमीवर परतताना मला खरंच खूप आनंद होतोय. या नाटकात आशुतोष राणा या रावणाच्या भूमिकेत आहे. त्याविषयी त्यांनी नुकतच एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. 


रावणाची भूमिका साकारतानाचा अनुभव


आशुतोष राणा यांनी नुकतच नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांचा हा अनुभव सांगितला. यावेळी त्यांना रावणाच्या भूमिकेत काय खास जाणवलं याविषयी विचारण्यात आलं, त्यावेळी त्यांनी म्हटलं की, 'जेव्हा तुम्ही एखाद्याला मित्र म्हणून पाहता तेव्हा त्याचे दोषही निर्दोष दिसतात. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्याला शत्रू म्हणून पाहता तेव्हा तुम्हाला फक्त त्याचे अवगुण दिसतात. रावणाने रामाला कायम शत्रूच्या दृष्टीने पाहिले कारण त्याला रामाच्या अवगुणांमध्ये नाही तर रामाच्या गुणांमध्ये रस होता. काही लोकं जवळ येऊन लढाई करतात पण रावण लढाई करुन रामाच्या जवळ गेला. त्यामुळे तोपर्यंत या जगात रामाचा जप केला जाईल, तोपर्यंत रावण आठवावाच लागेल.' 


दरम्यान रंगभूमीवर काम केल्यानंतर इतकी वर्षा तिच्यापासून दूर राहिल्याने तिला मिस नाही का केलं असा प्रश्न देखील यावेळी आशुतोष राणा यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी म्हटलं की, 'मिस त्या गोष्टीला केलं जातं जी तुम्ही विसरता'. पुढे त्यांनी म्हटलं की, 'तुमच्या मनात असलेली स्क्रिप्ट जर तुम्हाला मिळत नसेल तर दुसरी कोणतीही भूमिका करण्यापेक्षा तुम्ही ते काम न केलेलं बरं, विशेषत: ज्या माध्यमात (थिएटर) तुमचा जन्म झाला आहे.'






ही बातमी वाचा : 


Majha Katta : कसा असणार ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रम? 'माझा कट्टा'वर डॉ. निलेश साबळेने सांगितला शोचा फॉरमॅट