CSK vs LSG IPL 2024: लखनौ सुपर जायंट्सने (LSG) काल झालेल्या सामन्यात  चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) 8 विकेट्सने पराभव केला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 176 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौने सहज विजय मिळवला. 


लखनौकडून कर्णधार केएल राहुलने 53 चेंडूत 82 धावा केल्या. तर क्विंटन डी कॉकने 43 चेंडूत 54 धावा केल्या. केएल राहुल आणि क्विंटन डी कॉकच्या या खेळीनं लखनौचा विजय सोपा झाला.  चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर लखनौने आयपीएलच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. 


लखनौच्या विजयानंतर आणि केएल राहुलच्या या खेळीवर पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये 'and this guy' असं म्हटलं आहे. या कॅप्शनमध्ये अथियाने रेड हार्ट इमोजीचाही वापर केला आहे.






केएल राहुलचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय-


सामना संपल्यानंतर लखनौ आणि चेन्नईचे खेळाडूंनी हस्तांदोलन केले. यावेळी लखनौचा कर्णधार केएल राहुल आणि चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांची आधी भेट झाली. ऋतुराजच्या मागून एमएस धोनी येताच केएल राहुलने त्याच्या सन्मानार्थ लगेच आपली कॅप (टोपी) काढली आणि मग हस्तांदोलन केले. केएलने ज्येष्ठ खेळाडूचा अशा प्रकारे सन्मान केल्याने चाहते भारावून गेले आहेत. त्याचा हा हावभाव क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.






सामना कसा झाला?


लखनौचा कर्णधार राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने 20 षटकात 6 विकेट गमावत 176 धावा केल्या. रवींद्र जडेजाने 40 चेंडूत 57 आणि महेंद्रसिंग धोनीने 9 चेंडूत 28 धावा केल्या. लखनौने 19 षटकांत 2 बाद 180 धावा करत सामना जिंकला. कर्णधार केएल राहुलने 53 चेंडूत 82 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 43 चेंडूत 54 धावा केल्या. निकोलस पूरन 12 चेंडूत 23 धावा करून नाबाद माघारी परतला आणि मार्कस स्टोइनिस 7 चेंडूत 8 धावा करून नाबाद परतला.


संबंधित बातम्या:


MS Dhoni कडून चेंडू गिफ्ट मिळालेल्या चिमुकलीने सर्वांचं हृदय जिंकलं; 'माही'ला एक वचनही दिलं!


सावधान! धोनीनं मैदानात पाऊल टाकताच क्विंटन डी कॉकच्या पत्नीला नोटीफिकेशन गेलं; नेमकं काय घडलं?


कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्, Video