Ashok Saraf : "तुम्ही सगळे म्हणत असता, मराठी माणसाने हिंदी सिनेमात छोटे छोटे रोल केले. गडी आणि नोकर यांचेच रोल केले. त्याशिवाय इलाज नव्हता. कारण त्यांच्या इमेजमध्ये बसणारा हिरो दुसराच आहे. तो हिरो सहा फुटी आहे, गोरापान आहे. त्या कॅटेगिरीत आम्ही बसत नाहीत. हिंदी भाषेचा प्रॉबेलम उगाच तयार केला गेला. मला सांगा कुठला नट प्रॉपर हिंदी बोलतो? शत्रूघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन हे लोक हिंदी भाषिक भागातील आहेत. त्यांना चांगलं हिंदी येतं, पण बाकीचे कुठं नीट हिंदी बोलतात. मराठी माणूस हिंदी बोलत असताना त्यामध्ये थोडं हिंदी येतचं.. बंगाली माणूस हिंदी बोलतो, तेव्हा त्यात थोडं बंगाली येतं. गुजराती माणूस हिंदी बोलेन, तेव्हाही त्यामध्ये गुजराती येतं. मग मराठी बाबतचं असा विचार का? कारण त्यांना माहिती आहे, मराठी माणूस कोणत्या वेळेला काय करेन. ते टरकून असतात. त्यामुळे ते रिस्पेक्ट देतात. मला हिंदीमध्ये नेहमीच रिस्पेक्ट मिळाला, यात शंका नाही", असं ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणाले. काही दिवसांपूर्वी अशोक सराफ यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.
अशोक सराफ म्हणाले, मराठी इंडस्ट्रीत कुटुंब म्हणून काम केलं जातं. मी माझ्या कामाशी जास्त प्रामाणिक होतो, जास्त बडबडायचो नाही. ज्याच्यावर जमलं त्याच्यावर बोलायला आपण तयार असायचो. जे मला मराठीत करता येत होतं, ते हिंदीमध्ये येईल असं वाटत नाही. हिंदीमध्ये गेलं की अच्छा हा आर्टिस्ट आहे...मग ते त्याला जास्त पुढे जाऊ देणार नाहीत. माझे रोल त्यांना आवडायचे. पण त्यांनी मला रिपीट केलं नाही. मला त्यांनी छोट्या छोट्या रोलमध्येच आणलं.
पुढे बोलताना अशोक सराफ म्हणाले, माणून म्हणून शाहरुख फार छान आहे. एकदम मस्त आहे. तो फार डाऊन टू अर्थ आहे. मी त्याच्या बरोबर चार सिनेमे केले आहेत. मी अभिनयाबद्दल काही बोललं की , शाहरुख भाई तुम्ही थोड वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे होतं. तर मग तो लगेच म्हणायचा आपण पुन्हा एकदा याचा सराव करु. मेहनत घ्यायची त्याची नेहमी तयारी असते. अजय देवगण न बोलणारा माणूस आहे किंवा कमी बोलणारा माणूस आहे. सलमान सोबत सुद्धा मी चार सिनेमे केले. सलमानची वागण्याची स्टाईल आहे, तो कधी जास्त बोलत नाही. पण तो माझ्याशी बोलायचे. तु्म्ही कसे वागता, यावर बरंचं काही निर्भर असतं. हिंदी इंडस्ट्री मुळात पूर्णत: व्यावसायिक आहे. तुमचं काम करा आणि चालायला लागा, अशी पद्धत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
तब्बल 60 कोटींची चर्चा रंगली, पण युझीने धनश्रीला किती कोटी पोटगी दिली? अखेर कोर्टातून आकडा समोर आला!