Yuzvendra Chahal and Dhanashree verma, Mumbai : भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांनी आज (दि.19) घटस्फोटासंदर्भात मुंबई उच्च न्यायलयात हजेरी लावली. यावेळी वांद्रे कुटुंब न्यायालयानं दिलासा नाकारल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयकडून रद्द करण्यात आलाय. गुरुवार म्हणजेच उद्या (दि.20) मार्च रोजी चहल आणि धनश्रीला तातडीने घटस्फोट दिला जावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने वांद्रेतील कुटुंब न्यायालयाला दिले आहेत.
उद्याच धनश्री आणि युजवेंद्रला घटस्फोट द्या, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर उद्या तातडीनं चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट होण्याची शक्यता आहे. घटस्फोटासाठीचा किमान कालावधी हटवण्यास कुटुंब न्यायालयानं नकार दिला होता. मात्र आगामी आयपीएलपूर्वी तातडीनं घटस्फोट मिळवण्यासाठी दांपत्यानं कुटुंब न्यायालयाच्या निकालाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. चहल आणि धनश्री वर्मानं परस्पर सहमतीनं घटस्फोटासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.
धनश्रीला पोटगी म्हणून 4 कोटी 75 लाख रुपये देण्यास युजवेंद्र तयार
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने घटस्फोटासाठी परस्पर सहमतीने याचिका दाखल केलेली असली तर युजवेंद्र चहल धनश्रीला पोटगी देण्यासाठी तयार झालाय. युजवेंद्र चहल याने धनश्रीला 4 कोटी 75 लाख रुपये देण्यास मान्य केले आहेत. त्यापैकी 2 कोटी 37 लाख 55 हजार रुपये याधीच युझीने धनश्रीला दिले आहेत. उर्वरित रक्कम न दिल्यास हे न्यायालयाच्या निर्देशाचे पालन केले नाही, असे गृहित धरले जाणार आहे.
8 ऑगस्ट 2020 मध्ये झला होता साखरपुडा
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा 8 ऑगस्ट 2020 रोजी साखरपुडा झाला होता. त्यानंतर संपूर्ण देशभरातून चहलचं अभिनंदन करण्यात येत होतं. साखरपुड्यानंतर जवळपास 4 महिन्यांनंतर चहल आणि धनश्रीचा 22 डिसेंबर 2020 रोजी विवाह झाला होता. त्यांचा हा विवाह भारतीय पद्धतीने झाला होता.
सोशल मीडियावर 60 कोटींची चर्चा, मात्र पोटगीचा आकडा केवळ 4 कोटी 75 लाख
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून धनश्री आणि युझीच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर युझी चहल धनश्रीला पोटगी म्हणून 60 कोटी रुपये देणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, ही रक्कम केवळ 4 कोटी 75 लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे सोशल मीडियांवरील अफवांना पूर्णविराम लागलाय.