एक्स्प्लोर

Asha Bhosle Death: आशा भोसले ज्या 'चेस्ट इन्फेक्शन'शी लढत होत्या, ते नक्की का होतं? ऑर्गन फेल्युअरचा धोका कसा वाढतो? जाणून घ्या

Asha Bhosle Death: अत्यधिक थकवा आणि छातीतील संसर्गामुळे आशा भोसले यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

Asha Bhosle Death: प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं आज (रविवार, १२ एप्रिल) निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 93 वर्षांच्या होत्या. काल (शनिवारी, ता ११) प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आशा भोसले (Asha Bhosle Death) यांच्या निधनाचं कारण सांगितलं. सर्व अवयव निकामी झाल्याने (मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे) त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. त्यांना मेडिकल प्रॉब्लेम होता, असं देखील डॉक्टर म्हणाले. आशा भोसले यांच्या पार्थिवावर उद्या (सोमवार) दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल, अशी माहिती आनंद भोसले यांनी दिली. तर सकाळी ११ ते २ दरम्यान लोअर परळ इथल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेता येईल.(Asha Bhosle Death)

अत्यधिक थकवा आणि छातीतील संसर्गामुळे आशा भोसले यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. प्रारंभी काही माध्यमांत हृदयविकाराचा झटका आल्याची चर्चा होती. मात्र त्यांच्या नात जनाई भोसले यांनी स्पष्ट करत, छातीतील संसर्ग आणि तीव्र थकवा हीच रुग्णालयात दाखल होण्यामागची प्रमुख कारणे असल्याचे सांगितले. ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर प्रतीत समदानी यांनीही त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे.(Asha Bhosle Death)

Asha Bhosle Death: छातीतील संसर्ग म्हणजे काय?

छातीतील संसर्ग हा फुफ्फुसे किंवा श्वसनमार्गांवर परिणाम करणारा आजार आहे. हा प्रामुख्याने व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होतो. वयोमान वाढल्यास या संसर्गाचा धोका अधिक वाढतो. बहुतांश वेळा हा संसर्ग सौम्य असतो आणि औषधोपचारांनी बरा होतो; मात्र काही प्रकरणांत तो गंभीर स्वरूप धारण करून जीवघेणा ठरू शकतो.

Asha Bhosle Death: कोणत्या आजारांचा समावेश?

छातीतील संसर्गामध्ये मुख्यतः ब्रॉन्कायटिस आणि निमोनिया हे आजार आढळतात.

ब्रॉन्कायटिस: श्वसनमार्गातील मोठ्या नलिकांमध्ये सूज येते. सतत खोकला आणि कफ ही त्याची प्रमुख लक्षणे असून हा प्रामुख्याने व्हायरल संसर्गामुळे होतो.

निमोनिया: फुफ्फुसातील लहान नलिका आणि एअर सॅक्समध्ये संसर्ग होतो. हा अधिक गंभीर प्रकार असून तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज भासते. विशेषतः वृद्धांमध्ये याचा धोका जास्त असतो.

Asha Bhosle Death:  संसर्ग का धोकादायक ठरतो?

आरोग्य तज्ञांच्या मते, ज्यांना आधीपासून इतर आजार (कोमॉर्बिडिटी) आहेत, त्यांच्यात छातीतील संसर्ग गंभीर होण्याची शक्यता अधिक असते. योग्य वेळी उपचार न केल्यास हा संसर्ग शरीरातील इतर अवयवांवर परिणाम करून मल्टी-ऑर्गन फेल्युअरपर्यंत जाऊ शकतो.

Asha Bhosle Death:  याची लक्षणे काय आहेत?

सर्दी किंवा फ्लूनंतर छातीतील संसर्ग होण्याची शक्यता असते. सतत खोकला, श्वास घेण्यास त्रास, ताप, छातीत वेदना अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget