Arun Govil in Lok Sabha 2024:  भाजपकडून (Bjp) लोकसभा (Lok Sabha Election 2024) उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) हिला हिमाचल प्रदेशातून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. त्यातच छोट्या पडद्यावर गाजलेल्या रामायणात रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल (Arun Govil) यांना देखील लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठ (Meerut) या मतदारसंघातून भाजपनं तिकीट दिलंय. त्यामुळे आता अरुण गोविल देखील भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शनिवार 23 मार्च रोजी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीला भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. त्यावेळीच भाजपच्या पाचव्या यादीतील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. 


उत्तर प्रदेशातून भाजपने नव्या चेहऱ्याला दिली संधी


भाजपने पाचव्या यादीतील अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे रद्द करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये गाझियाबादचे खासदार व्हीके सिंह यांना तिकीट न दिल्याने अतुल गर्ग यांना संधी देण्यात आली आहे. सुलतानपूरच्या विद्यमान खासदार मनेका गांधी यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. रामायण या लोकप्रिय मालिकेत रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना मेरठ लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.


कंगनाही लोकसभेच्या रिंगणात 


अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) हिला लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली असून भाजपकडून तिला तिकीट देण्यात आलं आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून कंगना लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. मागील अनेक दिवसांपासून कंगनाच्या निवडणुकीची चर्चा होती. त्यातच आता कंगनाला भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभेचं बिगुल वाजल्यानंतर अनेक कलाकारांच्या नावाची चर्चा लोकसभेसाठी सुरु होती. त्यात कंगनाचं नाव आघाडीवर होतं. त्यातच कंगनाच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे ती फार चर्चेत असते. त्यामुळे तिला भाजपमधून तिकीट मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं. अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला असून कंगना हिमाचल प्रदेशातून तिकीट देण्यात आलं आहे. 


ही बातमी वाचा : 


Kangana Ranaut in Lok Sabha Election : कंगना हातात 'कमळ' घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरणार, 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक