Kangana Ranaut in Lok Sabha Election :  अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) हिला लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली असून भाजपकडून तिला तिकीट देण्यात आलं आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून कंगना लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. मागील अनेक दिवसांपासून कंगनाच्या निवडणुकीची चर्चा होती. त्यातच आता कंगनाला भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभेचं बिगुल वाजल्यानंतर अनेक कलाकारांच्या नावाची चर्चा लोकसभेसाठी सुरु होती. त्यात कंगनाचं नाव आघाडीवर होतं. 


त्यातच कंगनाच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे ती फार चर्चेत असते. त्यामुळे तिला भाजपमधून तिकीट मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं. अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला असून कंगना हिमाचल प्रदेशातून तिकीट देण्यात आलं आहे. आता कंगना हातात कमळ घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे. त्यावर आता तिला जनता काय कौल देणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान ती भाजपकडूनच लढवणार हे जवळपास निश्चित होतं. त्यामुळे तिने राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला लावलेली हजेरी देखील चर्चेचा विषय होती. 


कंगनाच्या वडिलांनी सांगतिलं होतं ती निवडणूक लढवणावर


काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान कंगना रानौतचे वडील अमरदीप रानौत यांनी कंगना 2024 लोकसभा लढवणार असल्याचं सांगितलं होतं. पण त्यावेळी कंगना कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत त्यांना माहित नव्हतं. पण आता कंगना हिमाचल प्रदेशमधून निवडणूक लढवणार असल्याचं समोर  आलं आहे. त्यामुळे रुपेरी पडदा गाजवणारी ही अभिनेत्री लोकसभेच्या रिंगणातून जनतेच्या मनात पोहचणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 






कंगना रनौतच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... 


कंगना रनौतचा 'तेजस' (Tejas) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. अभिनेत्री सध्या 'इमरजेन्सी' या सिनेमामुळे चर्चेत आली होती. तिचा हा सिनेमाही काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.  या सिनेमात ती माजी प्रंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. दरम्यान सध्या कंगनाच्या लग्नाच्या देखील जोरदार चर्चा सुरु आहेत.  


ही बातमी वाचा : 


Manoj Bajpayee on Kangana Ranaut : कंगना राणौत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार चर्चा, मनोज वाजपेयी स्पष्टचं म्हणाला...