एक्स्प्लोर

Drug Case Investigation | अर्जुन रामपालच्या बहिणीला NCB चं समन्स

Drug Case Investigation प्रकरणी अर्जुन रामपाल याच्यामागे असणाऱ्या अडचणी काही केली कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत.

Drug Case Investigation प्रकरणी अर्जुन रामपालच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत. आधी अर्जुन, पुढं त्याची प्रेयसी, तिचा भाऊ आणि आता अर्जुनच्या बहिणीलाही एनसीबीनं रडारवर घेतलं आहे. कोमल रामपाल या अर्जुनच्या बहिणीला एनसीबी अर्थात Narcotics Control Bureau (NCB) नं समन्स बजावलं आहे.

समन्स बजावत अर्जुनच्या बहिणीला बुधवारी चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अर्जुन आणि त्याची पार्टनर गॅब्रिएला यांची एनसीबीकडून चौकशी करण्यात आल्यानंतर कोमल रामपाल हिला समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, मागील दोन आठवड्यांमध्ये अर्जुन रामपालच्या घरावर धाड टाकली असला त्या कारवाईमध्ये एनसीबीला काही प्रतिबंधित औषधं हाती लागली होती. यापैकीच काही औषधं आपल्या बहिणीची असल्याचं त्यांनं सांगितल्याची माहिती समोर आली. किंबहुना बहिणीच्या नावे औषधांची एक चिठ्ठी एनसीबीकडे देण्यात आली होती, ती खोटी असल्याचं आढळून आलं. याच प्रकरणात एनसीबीनं चौकशीसाठी अर्जुनच्या बहिणीला समन्स बजावल्याचं कळत आहे.

सुरुवातीपासून काय घडलं त्यावर एक नजर....

अर्जुनचं यावर म्हणणं काय...

एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, "अर्जुन रामपालने सांगितलं की त्याच्या घरात ज्या दोन प्रकारच्या गोळ्या सापडल्या आहेत, त्यापैकी एक गोळी कुत्र्यासाठीची असून जी वेटनरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली होती. तर दुसरी गोळी बहिणीची आहे. दिल्लीतील एका मानसोपचारतज्ज्ञांनी तिच्या एन्झायटीबाबत ही गोळी दिली होती." "ज्या संशयाच्या आधारे मला चौकशीसाठी बोलवलं होतं तो संशयच बिनबुडाचा आहे," असंही अर्जुन रामपालने आपल्या जबाबात म्हटलं होतं.

एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन रामपालच्या प्रेयसीचा भाऊ अॅगिसियालोस डेमीट्रिएड्सला अटक केल्यानंतर एनसीबीने जेव्हा त्याचा मोबाईल तपासला असता त्याचे अर्जुन नावाच्या व्यक्तीसोबतचे काही चॅट्स सापडले होते. त्या चॅटमध्ये ड्रग्जचा उल्लेख होता. मग 9 नोव्हेंबरला एनसीबीच्या पथकाने अर्जुन रामपालच्या वांद्र्यातील कॅप्री हाईट्स इथल्या घरात छापा मारला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Radhika Apte: 'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील भन्नाट BTS VIDEO; प्रसाद खांडेकर अन् वनिता खरात ऑन रिहर्सल मोड, सचिन गोस्वामी घेतायेत सराव
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील भन्नाट BTS VIDEO; प्रसाद खांडेकर अन् वनिता खरात ऑन रिहर्सल मोड, सचिन गोस्वामी घेतायेत सराव
Sonarika Bhadouria: 'आमने सामने' नाटकाच्या वादानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीनंही सोडलं मौन, मानधन वाढवून मागितल्यानं गाजलेल्या मालिकेतून काढलेलं? नेमकं खरं काय?
'आमने सामने' नाटकाच्या वादानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीनंही सोडलं मौन, मानधन वाढवून मागितल्यानं गाजलेल्या मालिकेतून काढलेलं? नेमकं खरं काय?
Veen Doghatli Hi Tutena Promo: 'डोळे फुटले का म्हाताऱ्या?', स्वानंदीसमोर येणार वडिलांचं मन हेलावणारं सत्य, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये धक्कादायक ट्विस्ट
'डोळे फुटले का म्हाताऱ्या?', स्वानंदीसमोर येणार वडिलांचं मन हेलावणारं सत्य, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये धक्कादायक ट्विस्ट

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget