एक्स्प्लोर

Arbaaz Khan Viral Video: अभिनेता अरबाझ खानच्या कारमध्ये घुसला युवक, सुरक्षा रक्षकांची उडाली धांदल; बॉडीगार्डने बदडलं; VIDEO व्हायरल

मनोरंजनसृष्टीत आजकाल अनेकांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असताना कलाकारांना अशा विचित्र प्रकारांना समोरे जावं लागत असल्याचं चाहते म्हणत आहेत.

Arbaaz Khan:  बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता अरबाझ खान( Arbaaz Khan) सध्या चर्चेत आहे, त्याच्यासोबत कोलकाता मध्ये घडलेल्या एका विचित्र घटनेमुळे. एका कार्यक्रमासाठी अरबाझ कोलकाताला गेलेला, त्यावेळी तिथून निघताना एक व्यक्ती सुरक्षारक्षकांना चकवून  अचानक त्याच्या कारमध्ये घुसला  आणि आतच जाऊन बसला. यावेळी अरबाझही काहीसं घाबरला होता.यानंतर मात्र, सतर्क सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला तातडीने गाडीतून बाहेर काढले.अरबाजच्या सिक्योरिटी गार्डने त्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. या  घटनेचा VIDEO सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.  ही घटना घडली त्यावेळी अरबाझ आपल्या कारजवळचं उभा असल्याचं दिसलं. मनोरंजनसृष्टीत आजकाल अनेकांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असताना कलाकारांना अशा विचित्र प्रकारांना समोरे जावं लागत असल्याचं चाहते म्हणत आहेत.

Arbaaz Khan Kolkata Video: नेमकं घडलं काय?

बॉलिवूड अभिनेता अरबाज खानसोबत कोलकाता येथे एक धक्कादायक प्रकार घडला. एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर अरबाज आपल्या कारमध्ये बसण्यासाठी निघाला होता. मात्र, अचानक एक अनोळखी तरुण सुरक्षा रक्षकांना चकवा देत थेट त्याच्या गाडीपर्यंत पोहोचला. एवढेच नाही तर त्याने कारचा दरवाजा उघडून गाडीत प्रवेशही केला. या घटनेमुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अरबाज खान आपल्या कारजवळ उभा असल्याचे दिसते. तो गाडीत बसण्याच्या तयारीत असतानाच गर्दीतून वाट काढत आलेल्या एका तरुणाने थेट कारमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार इतक्या वेगाने घडला की काही क्षणांसाठी उपस्थितांनाही काय घडत आहे हे समजले नाही. अचानक कारमध्ये घुसलेल्या त्या व्यक्तीमुळे अरबाजही काहीसा घाबरलेला आणि अस्वस्थ दिसत होता.

घटनेची माहिती मिळताच अरबाजच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेत त्या तरुणाला गाडीतून बाहेर ओढले. त्यानंतर त्या व्यक्तीने सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून बाउन्सर्सनी त्याला गाडीपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गर्दीतून "त्याला मारा, त्याला मारा" अशा आरोळ्याही ऐकू आल्या.

सुरक्षा रक्षकांनी दिला चांगलाच चोप

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला जमावापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पुन्हा गाडीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बाउन्सर्सशी हुज्जत घालू लागला. त्याच्या गैरवर्तनामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याला चांगलाच चोप दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या सर्व गोंधळात अरबाज काही काळ तिथेच उभा राहून परिस्थितीवर लक्ष ठेवत होता. नंतर त्याने सुरक्षा रक्षकांना त्या तरुणाला सोडून देण्यास सांगितल्याचेही सांगितले जात आहे. अखेर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर अरबाज खान सुरक्षितपणे आपल्या गाडीत बसला आणि तातडीने तेथून निघून गेला. खान कुटुंबाला याआधी अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळालेल्या असल्याने या घटनेकडे सुरक्षा व्यवस्थेतील मोठी त्रुटी म्हणून पाहिले जात आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या प्रकाराला "धक्कादायक" आणि "भयानक" असे म्हटलं आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget