Apurva Nemlekar Trolled: 'ही म्हातारी..., हिचा चेहरा लूज पडलाय...'; ट्रोल करणाऱ्या महिलेला तिचाच फोटो शेअर करुन अपूर्वा नेमळेकरनं झापलं
Apurva Nemlekar Trolled: मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या एका पोस्टवर कमेंट करुन ट्रोल करणाऱ्या महिलेला अभिनेत्रीनं झोडपून काढलंय. तसेच, तिनं त्या महिलेल्या फोटोसोबत पोस्ट शेअर केलीय.

Apurva Nemlekar Trolled: 'रात्रीस खेळ चाले' (Ratris Khel Chale) फेम शेवंता म्हणजे, मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Marathi Actress Apurva Nemlekar). आपलं पहिलं लग्न मोडल्यानंतर अपूर्वानं तनुज गोवळकरसोबत (Tanuj Govalkar) दुसरी लग्नगाठ बांधली. मॅट्रिमोनीअल साईटवर अपूर्वा आणि तनुजची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अपूर्वा आणि तनुज सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच अपूर्वानं तिनं नवऱ्यासोबत केलेल्या अमेरिका टूरचा व्हिडीओ शेअर केला. अपूर्वाची पहिली मंगळागौरही अमेरिकेतच साजरी करण्यात आली. अपूर्वानं आपल्या मंगळागौरीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटो आणि व्हिडीओंमध्ये अपूर्वानं पारंपरिक साज केलाय. पण, तरीसुद्धा एका महिलेनं अपूर्वाच्या पोस्टवर कमेंट करुन तिला जोरदार ट्रोल केलंय. या महिलेनं थेट अपूर्वाच्या वजनावरुनच तिला ट्रोल केलंय.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नेमकं काय म्हणाली? (Apurva Nemlekar Trolled Her Physique)
मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या एका पोस्टवर एका युजरनं कमेंट केलीय. कमेंटमध्ये अपूर्वाला ट्रोल करताना म्हटलंय की, "किती जाड आणि वयस्कर दिसते ही अपूर्वा म्हातारी... मेकअपमुळे बरी दिसते नाहीतर हिचा चेहरा लूज पडलेला आहे. नशीब हिचं लहान वयाच्या मुलासोबत लग्न झालं... पंचवीस वर्षांपूर्वी लग्न झालं असतं तर हिचा मुलगा आता नवरा केला त्याच्या वयाचा असता. ठीक आहे लगान तर लहान लग्नाची हौस तर झाली. नवरोबाची आई वाटते ही. नुसतं सुंदर असूनही उपयोग नाही... शेवटी नशीब..."

ट्रोल झाल्यानंतर अपूर्वा नेमळेकर हिनं महिलेच्या कमेंटचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत संताप व्यक्त केलाय. अपूर्वानं लिहिलंय की, "बोर्डच्या मागे लपून विष ओकायला कष्ट लागत नाहीत. स्वत:च्या आयुष्यात किती रिकामेपण आणि नैराश्य असेल की, एका अनोळखी माणसाच्या दिसण्यावर आणि लग्नावर इतकं घाणेरडं भाष्य करावं लागतं? सोशल मीडियावर नकारात्मकता आणि वास्तव दाखवण्यासाठी मी हे इथे शेअर करतीये. मला यानं काही फरक पडत नाही पण ही विकृती समोर येणं गरजेचं होतं..."

दरम्यान, अपूर्वा नेमळेकरच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, तिनं 'आभास हा' मालिकेतून अभिनयाची सुरुवात केली. मात्र, 'रात्रीस खेळ चाले 2' मधील 'शेवंताची' भूमिका तिच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरली. त्यानंतर ती 'बिग बॉस मराठी'मध्येही दिसली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















