Anushka - Virat Welcome Baby आम्हाला सांगण्यास आनंद होतोय की..... अशीच काहीशी सोशल मीडिया पोस्ट लिहित अनेक भावना त्यात माध्यमातून एकवटत (Virat Kohli) विराट कोहली यानं त्याच्या मुलीचं या जगात स्वागत केलं. मुलीच्या जन्माचं वृत्त जाहीर करताना त्यानं लिहिलेली पोस्ट पाहून अनेकांनाच आनंद झाला. क्रीडा विश्वापासून ते अगदी कलाविश्वापर्यंत आणि असंख्य चाहत्यांच्या वर्तुळातून या जोडीवर शुभेच्छांचा अविरत वर्षाव करण्यात आला. त्यांच्या चिमुकलीचं सर्वांनीच आपलेपणानं स्वागत केलं.


सोमवारी दुपारच्या सुमारास विराटनं आपल्या आणि (Anushka sharma) अनुष्काच्या नात्यात एका चिमुकलीचं आगमन झाल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सोशल मीडियावर तर जन्मानंतर अवघ्या काही क्षणांतच हा विषय ट्रेंडमध्ये आला. मुलीचं नाव ते तिचा पहिलं छायाचित्र या साऱ्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.


उत्साहाच्या याच वातावरणात अखेर विरुष्काच्या लाडक्या लेकीचा पहिलावहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. विराटचा भाऊ, विकास कोहली यानं सोशल मीडियावर कोहली कुटुंबातील या नव्या सदस्याचं पहिलं छायाचित्र शेअर केलं. यामध्ये विकासनं अगदी काळजी घेत मुलीच्या पावलांचंच छायाचित्र पोस्ट केलं. शुभ्र कापडावर स्थिरावलेली इवलीशी पावलं आणि या चिमुकलीचं स्वागत करतानाची कार्टून पात्र असा एक काही सेकंदांचं व्हिडीओवजा छायाचित्र त्यानं पोस्ट केलं. ज्यानंतर अनेकांनीच कमेट करत या परिचं स्वागत केलं.


विराटची बहीण भावना कोहली धिंग्रा, हिनंही आत्या झाल्याचा आंद एका पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला. अतिशय उत्साहात विराटच्या लेकीनं संपूर्ण देशानंच स्वागत केलं असं म्हणायला हरकत नाही.








विराटनं मुलीच्या जन्माबाबतची माहिती देताना काय लिहिलं?


'तुम्हा सर्वांनाच सांगण्यात अत्यानंद होत आहे, की आज दुपारीच आम्हाला एक कन्यारत्न झालं. तुम्हा सर्वांचं प्रेम, आशीर्वाद आणि प्रार्थनांसाठी मी आभारी आहे. अनुष्का आणि बाळ दोघीसुद्धआ सुदृढ आहेत आणि आम्ही या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी स्वत:ला नशीबवान किंवा त्याहीपलीकडे समजतो. सध्याच्या घडीला तुम्हीही आमच्या जीवनातील गोपनीयतेचा आदर कराल अशी मी आशा करतो', असं विराटनं मुलीच्या जन्माची पोस्ट लिहिताना सर्वांना उद्देशून म्हटलं.