मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या मुलीच्या जन्मानंतर सध्या सिल्व्हर स्क्रीन पासून दूर आहे. अनुष्का सिल्व्हर स्क्रीनपासून दूर असली तरी कायम चर्चेत आहे. सध्या अनुष्का पती विराट कोहली आणि लेक वामिका यांच्या सोबत इंग्लंडमध्ये क्वॉलिटी टाईम घालवत आहे.
अनुष्का इंग्लंडमध्ये असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच विराट आणि अनुष्का एका लंचसाठी बाहेर गेले होते. याचे काही फोटो अनुष्काने हॉटेलच्या शेफ सोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोमध्ये अनुष्का कॅज्युअल अंदाजात दिसून आली. अनुष्काने ऑफ व्हाईट क्रॉप स्वेटर, निळी जीन्स आणि स्निकर्स घातले आहे. अनुष्काने मास्क देखील या वेळी घातला आहे. त्याबरोबर हूप इअररिंग्स आणि ब्लॅक हॅन्डबॅगने अनुष्काचा लूक परफेक्ट केला आहे. तिच्या या लुकपेक्षा सर्वांचं लक्ष वेधलं ते अनुष्काच्या नव्या हॅण्डबॅगने. अनुष्काने प्राडा (Prada) ब्रँडची बॅग घेतली होती. या बॅगेची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसला नाही तर नवल.
अनुष्काचा नवरा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या वन डे, टेस्ट, टी-20, आयपीएल यामध्ये जेवढ्या धावा केल्या नाहीत त्याहून जास्त किंमत या बॅगची आहे. विराटच्या धावांबद्दल बोलायचे झाले तर 29 हजारांच्या जवळपास त्याच्या धावा आहेत. पण Prada ची ही बॅग जवळपास 1 लाख रुपयांची आहे. ही बॅग दोन प्रकारात उपलब्ध आहे. एक नायलॉन आणि एक लेदरमध्ये. कंपनीच्या वेबसाईटनुसार नायलॉनच्या बॅगेची किंमत जवळपास एक लाख रुपये आणि लेदर बॅगेची किंमत ही त्याहीपेक्षा जास्त आहे.
अनुष्काने या काही शाकाहारी पदार्थाचे फोटो देखील शेअर केले आहे. त्याला कॅप्शन देत अनुष्काने म्हटले आहे, 'बेस्ट व्हेजीटेरियन फूड, वीगन फूड एव्हर'. गेल्या महिन्याताच वामिका 6 महिन्यांची झाली आहे. अनुष्का शर्मानं इंस्टाग्रामवर मुलीचे काही खास फोटो शेअर केले होते. कोणत्याही फोटोमध्ये वामिकाचा चेहरा दिसणार नाही याची विराट आणि अनुष्कानं काळजी घेतली होती. दरम्यान, सर्व चाहते वामिकाची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.