मुंबई : राज्यात आज 5 हजार 225 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 557 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 14 हजार 921 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.93 टक्के आहे.
राज्यात आज 154 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. एकूण 33 जिल्हे आणि महापालिका क्षेत्रात आज एकाही मृत्यूची नोंद नाही. धुळे, नंदुरबार, परभणी, अकोला, वर्धा, गोंदिया या पाच जिह्यांमध्ये आज एक कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,17,14,950 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,11,570 (12.4 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,29,047 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,614 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त
राज्यात सध्या 57 हजार 579 रुग्णावर उपचार सुरु आहेत. नंदुरबार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या शुन्यावर आली आहे. तर सर्वाधित 12 हजार 917 अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. एकूण 15 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. तर जळगाव 35, नंदूरबार- 0, धुळे- 6, परभणी - 16, हिंगोली - 76, नांदेड- 46, अमरावती 88, अकोला- 24, वाशिम - 7, बुलडाणा - 29, यवतमाळ- 16, वर्धा- 5, भंडारा- 3, गोंदिया- 2, गडचिरोली- 32 या जिल्ह्यामध्ये अक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 283 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 283 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 203 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,19,158 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,760 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 2054 दिवसांवर गेला आहे.
पुण्यात गेल्या 24 तासात 254 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुणे महापालिका क्षेत्रात गेल्या 24 तासात 254 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 119 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 4,80,208 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पुण्यात गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 2,186 सक्रिय रुग्ण आहेत.