मुंबई : अभिनेत्री पायल घोष हिने दिग्दर्शक, निर्माता अनुराग कश्यववर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. याबाबत मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये अनुराग कश्यपने आपला जबाब नोंदवला. सुमारे 8 तासांच्या दिर्घ चौकशीनंतर अनुराग पोलिस स्टेशनमधून बाहेर पडला.


आपल्यावर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांवर अनुराग कश्यपने वर्सोवा पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, एका चित्रपटाच्या संदर्भात तो ऑगस्ट 2013 मध्ये श्रीलंका येथे गेला होता. याबाबतचे कागदपत्र त्याने पोलिसांना दिले आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर 2013 मध्ये कामाच्या संदर्भात श्रीलंका, म्यानमारमध्ये होतो. अनुरागने यासंबंधी पोलिसांना सर्व पुरावे सादर केले. यामध्ये विमानाचं तिकीट आणि इमिग्रेशनचे कागदपत्र आहेत.


अनुराग कश्यपने ज्या ठिकाणी घटना घडल्याचा दावा केला आहे, यास पूर्णपणे नकार दिला आहे. अनुराग कश्यपने आपला जबाब नोंदवताना पुरावेही सादर केले आहेत, जे तक्रारदाराच्या आरोपाचे खंडन करतात.


बॉलिवूड अभिनेत्रीकडून दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल


वर्सोवा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग कश्यपने पोलिसांच्या प्रश्नाला उत्तर देताना आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. अनुरागने पोलिसांना सांगितले की, मला फक्त कामानिमित्त पायल घोषला ओळखतो. मी मागील अनेक महिन्यांपासून पायलशी संवाद साधलेला नाही किंवा भेटलो देखील नाही. मी पायलला वर्सोवा येथील त्यांच्या घरी भेटलो नाही किंवा कधी लैंगिक अत्याचारही केला नाही.


अनुराग कश्यप पुढे म्हणाला की, पायलने माझ्यावर असे आरोप केले आहेत हे जेव्हा मला कळले तेव्हा मला धक्का बसला. हे सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. कदाचित कट रचून माझ्याविरूद्ध तक्रार केलेली आहे. मी या प्रकरणात पूर्णपणे निर्दोष आहे.


वर्सोवा पोलिसांना दिलेल्या जबाबात, अनुरागने ड्रग्ज घेण्याबाबतही नकार दिला आहे. अनुराग म्हणाला की, मी फक्त सिगारेट ओढतो. पोलीस अनुरागला पुन्हा चौकशीसाठी बोलावणार आहेत. याव्यतिरिक्त ऑगस्ट आणि सप्टेंबर 2013 मध्ये पोलिसांनी परदेशात असल्याचा अतिरिक्त पुरावा सादर करण्यासही सांगितले आहे.


संबंधित बातम्या