मुंबई : अनुराग कश्यपसाठी रविवारचा दिवस फार बरा नव्हता. कारण, कशात काही नसताना अचानक अभिनेत्री पायल घोषने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप केले. अनेकांसाठी हा मोठा धक्का होता. आपल्याशी बोलताना त्याने विशिष्ट मागणी केली. त्यानंतर बोलताना तो म्हणाला, तू इतकी शाय का आहेस, मी जवळपास 200 मुलींसोबत 'वेळ' घालवला आहे. आणि त्या सर्वांसाठीच तो चांगला वेळ होता. पायलने हे स्टेटमेंट दिल्यावर इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली. व्यक्तिगत स्वार्थासाठी अनेक अभिनेत्री मी टूचा आरोप करत असताना दिसतंय. ती बाबही आता नवी राहिली नाही. अनुरागनेही त्याचं उत्तर दिलं. पण त्याला काही तास उलटतात न उलटतात तोच आता अनुरागच्या पाठिशी दोन अभिनेत्री उभ्या राहिल्या आहेत.


पायल घोषने हे आरोप केल्यानंतर अनुरागने तातडीने ट्वीट करून आपली भूमिका सांगितली. 'आता वारंवार असे हल्ले होतील. आता अनेक ठिकाणहून असे घाव घातले जातील. मीही वाट पाहातोय.', अशा स्वरूपाचं ट्वीट त्यानं केलं होतं. त्याचीही चर्चा झाली. हे ट्वीट करत असतानाच अनेक मित्रांनी त्याला कुठेही काहीही न बोलण्याचाही सल्ला दिला. हेही त्यानं सांगितलं. पण असे आरोप झाल्यानंतर इतर कोणी अभिनेत्री इतर कोणा व्यक्तिच्या पाठिशी उभी राहिलेली दिसली नव्हती. कोणी काही बोलत नव्हतं असे आरोप झाल्यानंतर. पण अनुराग मात्र त्याला अपवाद
ठरला आहे. अनुरागवर हे आरोप झाल्यानंतर अभिनेत्री राधिका आपटे आणि अभिनेत्री रिचा चढ्ढा यांनी अनुरागला समर्थन दिलं आहे.


अनुरागवर आरोप झाल्यानंतर आपल्या इन्स्टावर केलेल्या पोस्टद्वारे अभिनेत्री राधिका आपटेने अनुरागला समर्थन दिलं आहे. 'मी तुझ्यासोबत जेव्हा केव्हा होते, तेव्हा मला खूपच सुरक्षित वाटलं. आपल्याला एकमेकांबद्दल असलेला आदर आणि प्रेम महत्वाचं आहे.' , असं सांगत अनुरागच्या स्वभावावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न राधिकाने केला आहे. तर अनुरागवर असे आरोप झाल्यानंतर त्याची पहिली पत्नी आरती बजाजनेही यावर अनुरागची बाजू घेतली. त्याच्यावर आरोप झाल्यानंतर आरतीनेही आपल्या इन्स्टावरच्या पोस्टवरून पायलच्या या आरोपांचं खंडन केलं आहे. ती म्हणते, 'इतका नीच पातळीवरचा आरोप अशा पद्धतीने होईल याचा मी कधीच विचार केला नव्हता. अनुराग हा कसा आहे? हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे. असं असताना मी टू सारख्या शस्त्राचा एखाद्याला बदनाम करण्यासाठी वापर करणं निखालस चूक आहे.'


तर दुसरीकडे अभिनेत्री रिचा चढ्ढाकडूनही एक स्टेटमेंट आलं आहे. पायल घोषने एका वृ्त्तवाहिनीला याची माहीती देताना रिचा चढ्ढाचंही नाव घेतलं होतं. हे कळल्यानंतर रिचाच्या वकिलाने तातडीने एक जाहीर खुलासा केला असून, रिचाचा या मुद्द्याशी काही संबंध नसून, अनुरागवर झालेल्या आरोपांशी आपला काही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. पायल घोषने हे आरोप केल्यानंतर कंगना रनौतनेही पायलची बाजू घेत लगेच अनुरागला अटक करण्याची मागणी केली होती. अनुरागवर हे आरोप झाल्यानंतर आता थेट अनुरागवर राजकीय मतभिन्नतेमुळे असे आरोप लगावले जातायत का असंही दबक्या आवाजात विचारलं जाऊ लागलं आहे. पण या आरोपात तथ्य नसेल तर अशा आरोपांमुळे मी टू चळवळ डागाळली जाईल अशीही भीती अनेकांना वाटतेय.


महत्त्वाच्या बातम्या :