जया सहाचं नाव सर्वात आधी रिया चक्रवर्तीशी झालेल्या चॅटमध्ये समोर आलं होत. सुशांतच्या चहामध्ये तीन ते चार थेंब सीबीडी ऑइल टाकून देण्याचा सल्ला जया सहाने रिया चक्रवर्तीला चॅटद्वारे दिला होता ज्यानंतर पहिल्यांदाच जया सहा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासाच्या घेऱ्यात आली होती.
जया सहाचं चॅट फक्त रिया चक्रवर्ती सोबतच नाही तर नम्रता शिरोडकर सोबत ही समोर आलं आहे. नम्रता शिरोडकर ड्रग्सची मागणी जया सहाकडे करत होती. जयाने तुझी इच्छा माझ्यासाठी आदेश अशा स्वरूपाचं उत्तर या चॅटमध्ये दिलं आहे. ज्यामुळे आता बॉलिवूडमधील अजून मोठी नावे समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाहा व्हिडीओ : ड्रग्ज खरेदीप्रकरणी अभिनेत्री दिया मिर्झानं सर्व आरोप फेटाळले
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून जया सहाला विचरण्यात असलेले प्रश्न
- जवळपास 6 तास जयाची चौकशी झाली. ज्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न जयाला विचारण्यात आले.
- जयाला विचारण्यात आले की, ते ड्रग्स पेडलर कोण होते, ज्यांच्याकडून ती सेलिब्रेटिंसाठी ड्रग्स घेत होती.
- जयाला तिचे चॅट दाखवून विचारण्यात आलं की, एका चॅटमध्ये तिच्या आणि नम्रता शिरोडकरमध्ये ड्रग्स संदर्भात चॅट होत आहेत
- NCB ने जयाला विचारलं की, तिने किती वेळा नम्रताला ड्रग्स घेऊन दिले.
- एका चॅटमध्ये श्रद्धा कपूर जया कडून ड्रग्स मागत होती, हे चॅटसुद्धा जयाला दाखवण्यात आलं असून श्रद्धाने किती वेळा CBD Oil मागवलं?
- या व्यतिरिक्त करिश्मा प्रकाश संदर्भात सुद्धा जयाला विचारण्यात आलं. करिश्मा प्रकाश आणि दीपिका पदुकोणमध्ये झालेल्या ड्रग्स संदर्भात चॅटबद्दल जयाला काय माहिती आहे? हा प्रश्न NCB कडून विचारण्यात आला.
तर क्वान कंपनीचा CEO ध्रुव चितगोपेकर सुद्धा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने काल चौकशीसाठी बोलावले होते.
- ध्रुव क्वान कंपनीचा CEO आहे. त्याचं नाव कुठेही ड्रग्स प्रकरणात समोर आलं नाही. मात्र क्वान कंपनीच्या पॉलिसीबद्दल आणि कोण कर्मचारी काय काम करतात, याबद्दल त्याला विचारण्यात
आलं.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या प्रश्नांना जया सहाने काय उत्तरे दिली
- जया सहाची चौकशीत कबुली
- एनसीबीने जेव्हा जयाला चॅट दाखवून विचारले तेव्हा तिने श्रद्धा कपूरसाठी सीबीडी ऑइल अरेंज केल्याचं सांगितलं आहे.
- सीबीडी ऑइल जयाने श्रद्धासाठी ऑनलाईन मागवलं होतं.
- नम्रता शिरोडकरसोबत चॅट या प्रश्नावर जयाने सांगितले की, चॅट तिचेच आहे. मात्र तिला या चॅटबद्दल काही आठवत नाही.
- याच्या व्यतिरिक्त सुशांतसाठी, रियासाठी, फिल्म मेकर मधु मांटेना वर्मा आणि स्वतःसाठी सीबीडी ऑइल मागवलं असल्याचं जयाने सांगितलं.
मात्र सीबीडी ऑइल हे एक ड्रग्सचं तेल आहे. ज्याला भारतामध्ये बंदी आहे. जया सहाच्या आजच्या जबाबामुळे श्रद्धा कपूर आणि नम्रता शिरोडकर यांच्या अडचणींमध्ये नक्कीच वाढ होण्याची शक्यता आहे. तर क्वान कंपनीची दुसरी कर्मचारी करिश्मा प्रकाशची सुद्धा काल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी करण्यात आली, करिश्माचं दीपिका पादुकोणसोबत ड्रग्स संदर्भातील चॅट आणि याच संदर्भातील काही पुरावे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या हाती लागले आहेत. त्याच्यामुळे आज करिश्माची चौकशी करण्यात आली. क्वान कंपनीचे डायरेक्टर मधु मांनटेनाचीसुद्धा चौकशी एमसीबीकडून करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या :