Anurag Kashyap On Animal : काही महिन्यांपूर्वी संदीप वंगा रेड्डी यांचा अॅनिमल हा सिनेमा हा रिलीज झाला होता. त्यानंतर या सिनेमाच्या तुफान चर्चा रंगल्या आहेत. अतोनात हिंसाचार आणि बोल्ड सीन्समुळे सिनेमा चर्चत आलाय. लेखक जावेद अख्तर यांनी अॅनिमलमधील एका सीनबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर निर्मातेही चांगलेच आक्रमक झाले होते. दरम्यान आता दिग्दर्शक अनुराग कश्यपने संदीप वंगा रेड्डीचे तोंडभरुन कौतुक केलय. 


अनुराग कश्यम सिनेमांबरोबरच त्याच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असतो. जावेद अख्तर आणि खासदार महिला अॅनिमल सिनेमाबाबत आक्षेप घेत असतानाच अनुरागने मात्र दिग्दर्शकाचे आणि सिनेमाचे कौतुक केलंय. अनुरागने संदीप वंगा रेड्डीबाबत काय म्हटले जाणून घेऊयात...


संदीप रेड्डींना चुकीचे समजले गेले 


अनुरागने काही दिवसांपूर्वीच संदीप वंगा रेड्डीची भेट घेतली होती. भेट घेतल्यानंतर अनुरागने त्यांचे फोटो शेअर देखील केले होते. या फोटोंमध्ये संदीप रेड्डी आणि अनुराग एकत्रित दिसत होते. सध्या सर्वांत संदीप वंगा रेड्डीला चुकीची समजले जात आहे आणि आकलनही चुकीच्या पद्धतीने सुरु आहे.


संदीप वंगा रेड्डीचे तोंड भरुन कौतुक


संदीप वंगा रेड्डीसोबतचे फोटो शेअर करताना अनुरागने एक मोठी पोस्ट लिहिली आहे. अनुराग म्हणाला, "संदीप वंगा रेड्डी आणि मी सायंकाळी सोबत होते. रेड्डी यांना चुकीचे समजले जात आहे. त्यांच्यावर टीका केली जात आहे. अनेकांनी त्याच्या सिनेमावर टीका केल्या आहेत. माझ्यासाठी ते सर्वांत प्रेमळ आणि इमानदार माणूस आहेत. मी त्यांच्या सिनेमाबाबत कोण काय बोलत आहे? याचा विचार करत नाही." 
 
'अॅनिमल' हिंदी सिनेमात गेम चेंजर सिनेमा 


अनुराग पुढे बोलताना म्हणाला, "मी संदीप वंगा रेड्डी यांची भेट घेऊ इच्छित होतो. त्याच्या सिनेमाबाबत मला अनेक प्रश्न विचारायचे होते. माझ्या प्रत्येक प्रश्नाचे वंगा रेड्डींनी उत्तर दिले. या बाबी मी दोनदा प्रत्यक्षात पाहिल्या होत्या. मी पहिल्यांदा अॅनिमल पाहिला त्याला 40 दिवस उजाडले आहेत. त्यानंतर दुसऱ्यांदा सिनेमा पाहिला त्याला 22 दिवस झाले आहेत. जास्त वेळेच्या सिनेमामध्ये हा सिनेमा सर्वांत मोठा गेम चेंजर ठरेल आणि हा असा सिनेमा आहे. ज्याचे परिणाम चांगले किंवा वाईट झाले हे आपण नाकारु शकत नाहीत."


'अॅनिमल'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ


रणबीरचा अॅनिमल हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊन 40 दिवस झाले आहेत 'अॅनिमल' या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 550.87 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात रणबीर शिवाय रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ती डिमरी यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. या चित्रपटातील डायलॉग्सनं आणि अॅक्शन सीन्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अॅनिमल या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच अॅनिमल पार्क या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या 


Telly Masala : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन ते 'शिवरायांचा छावा'चं पोस्टर आऊट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या