Anuradha Paudwal Joins BJP :  प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी राजकारणात एन्ट्री केली असून त्यांनी भाजपचं (BJP) कमळ हाती घेतलं आहे. अवघ्या काही तासांमध्ये लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election 2024) बिगुल वाजणार आहे. 16 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची (Election Comission) पत्रकार परिषद पार पडणार आहे. यामध्ये देशातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यातच देशात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अनेक राजकीय प्रवेश होत असल्याचं पाहायला मिळतंय. यातच आता अनुराधा पौडवाल यांनी देखील भाजपचं कमळ हाती घेतलंय. 


दरम्यान भाजपमध्ये अनुराधा पौडवाल यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच त्या भाजपसाठी स्टार प्रचारक असतील असं देखील सांगण्यात येत आहे.  त्याचप्रमाणे त्यांच्या या प्रवेशानंतर पक्षात त्यांना कोणती मोठी जबाबदारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान लोकसभा लढवणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना अनुराधा पौडवाल यांनी म्हटलं, की आता पक्ष मला जी जबाबदारी देईल, ती मी आनंदाने स्विकारेन. 


कोण आहेत अनुराधा पौडवाल?


पाच दशकांच्या कारकिर्दीत, अनुराधा पौडवाल यांनी गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, संस्कृत, बंगाली, तमिळ, तेलगू, उडिया, आसामी, पंजाबी, भोजपुरी, नेपाळी आणि भाषांसह 9,000 हून अधिक गाणी आणि 1,500 हून अधिक भजने गायली आहेत. त्यांचे 1969 मध्ये अरुण पौडवला यांच्याशी विवाह झाला. अरुण पौडवाल हे एसडी बर्मन यांचे सहाय्यक आणि संगीतकार होते. अनुराधा पौडवाल यांना दोन मुले आहेत, एक मुलगा आदित्य पौडवाल आणि एक मुलगी कविता पौडवाल. 1991 मध्ये तिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. अरुण पौडवाल यांच्या विवाह झाल्यानंतर अनुराधा पौडवाल यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. अभिमान या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा जया भादुरीसाठी श्लोक गायला होता. त्यानंतर प्रत्येक चित्रपटात अनुराधा यांच्या आवाजातील गाणं असायचंच, असा काळ सुरु झाला. 


अवघ्या काही तासांत निवडणुकांचं बिगुल वाजणार


लोकसभा 2024 निवडणुकांचं बिगुल आता अवघ्या काही तासांत वाजणार आहे. कोणत्या दिवशी काय होणार तसेच देशाला नवे पंतप्रधान मिळणार की मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर बसणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेतल्यानंतर आचारसंहिता लागू होणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : अंबानींच्या सोहळ्यात सुरु होता साडेतीन तास एका वस्तूचा शोध, प्री वेडिंगमध्ये हरवली मार्क झुकेरबर्गच्या बायकोची महागडी अन् महत्त्वाची वस्तू