MP Lok Sabha Election Result 2024 मध्य प्रदेश : संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे. तर त्यानंतर देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्रही स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्या समोर आलेला मतदानाचा कल लक्षात घेता देशात लोकसभा महालढतीचे अपेडेट्स क्षणाक्षणाला बदलताना दिसत आहे.अशातच मध्य प्रदेशातील लोकसभेच्या 29 जागांवर भाजपचने एकहाती वर्चस्व राखात सर्वच्या सर्व जागेवर आपली पकड कायम ठेवली आहे.


हाती आलेले मतमोजणीचे कल लक्षात घेता भाजपने सर्व 29 जागांवर सुरुवाती पासून आघाडी कायम ठेवली आहे. सध्या मध्य प्रदेशातील आकडेवारी धक्कादायक असून भाजपची घोडदौड क्लीन स्वीपकडे सुरू असल्याचे बघायला  मिळत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांनी आपली हार स्वीकार केली आहे. एकुणात मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव (Mohan Yadav) फॅक्टरने काम केले असल्याचे दिसून येत  आहे. भोपाळ असो, शहडोल असो की दमोह आणि गुणा, सर्वच जागांवर भाजपची ताकद दिसून येत आहे, तर काँग्रेस कुठेही खाते उघडताना दिसत नाही.


मध्य प्रदेशात भाजपची क्लीन स्वीपच्या दिशेने वाटचाल 


सध्याघडीला संपूर्ण मध्य प्रदेशात भाजपशी स्पर्धा करेल असे कोणीच नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे 29 पैकी 29 जागा भाजपच्या खात्यात जाताना दिसत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे कमलनाथ यांचा मुलगा नकुल नाथ छिंदवाडापर्यंत आपली पारंपरिक जागा वाचवण्यात देखील अपयशी ठरले आहे का, अशीच स्थिती सध्या दिसत. हे पाहता मध्य प्रदेशात मोहन यादव फॅक्टरने काम उत्तमरित्या केल्याचे दिसत आहे. भोपाळमध्ये भाजपचे उमेदवार आलोक सिंह, उज्जैनमध्ये भाजपचे खासदार अनिल फारोजिया, गुनामध्ये ज्योतिरादित्य सिंधिया, दमोहमध्ये भाजपचे उमेदवार राहुल सिंह सतत आघाडीवर आहेत. 


मध्य प्रदेशात लोकसभेच्या 29 जागांसाठी दुपारी 2 वाजेपर्यंत कल आला आहे. यामध्ये भाजपला सर्व जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. आता माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे वक्तव्य समोर आले आहे. कमलनाथ म्हणाले, "भारताच्या आघाडीचा ट्रेंड खूप चांगला आहे." छिंदवाड्यातील जनतेचा निर्णय मला मान्य आहे. छिंदवाडा येथेही काँग्रेस पिछाडीवर आहे, जी जागा त्यांनी गेल्या निवडणुकीत आम्ही जिंकली होती. भाजपचे सर्व उमेदवार आपापल्या जागेवर आघाडीवर आहेत.छिंदवाडाही काँग्रेसच्या ताब्यात जाताना दिसत असल्याचे ते म्हणाले. 


छिंदवाड्यात कमळ फुलणार?


दुसरीकडे सीएम मोहन यादव यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी छिंदवाड्यात कमळ फुलणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. सध्या तेच घडताना दिसत आहे. छिंदवाड्यातही भाजप कायम राहील, असेच संध्याच्या कलवरून दिसते आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशातील 29 पैकी 28 जागांवर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, छिंदवाडा ही एकमेव जागा आहे जी आतापर्यंत कमलनाथ कुटुंबाकडे होती, जी आता त्यांच्या बाजूने निसटताना दिसत आहे. 


रेवा येथे सर्वात कमी, छिंदवाडा येथे सर्वाधिक मतदान .


मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपला 58.0 टक्के आणि काँग्रेसला 34.73 टक्के मते मिळाली होती. भाजपने 28 जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसला छिंदवाड्याची एकच जागा वाचवता आली होती.  यावेळी अनेक जागांवर मतदानात घट झाली आहे. सर्वात कमी मतदान रीवा येथे 49.43 टक्के तर छिंदवाडा येथे सर्वाधिक (79.83 टक्के) मतदान झाले.


चार जागांची सर्वाधिक चर्चा 


छिंदवाडा, राजगढ, विदिशा आणि गुना येथील हॉट सीट्स आहेत. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र आणि खासदार नकुल नाथ छिंदवाडामधून उमेदवार आहेत. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी राजगडमधून, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विदिशामधून तर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुनामधून निवडणूक लढवली आहे. तिन्ही जागांवर ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. दिग्विजय सिंह यांच्या जागेवर 76.04 टक्के मतदान झाले. तर शिवराज यांना विदिशा मतदारसंघात 74.48  टक्के आणि गुनामध्ये 72.43 टक्के मते मिळाली.


इतर महत्वाच्या बातम्या