Madha Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे ( Loksabha Election Result) कल हाती येऊ लागले आहेत.  यामध्ये राज्यात महाविकास आघाडीने बऱ्यापैकी जागांवर आघाडीवर घेतली आहे. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीमध्ये आणखी एक मतदारसंघ चर्चेत राहिला. तो म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ. तिसऱ्या टप्प्यात माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघातील बागलवाडी येथे एका तरुणानं थेट ईव्हीएम मशीन पेटवल्याची (voter set the EVM machine on fire) घटना घडली होती. या मतदारसंघात नेमकी काय स्थिती आहे. तर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर हे पिछाडीवर आहेत. 


माढा लोकसभा मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला


दरम्यान, लोकसभा निवडणुकीत सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे माढा.  मतादानावेळी या मतदारसंघात बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. सांगोला तालुक्यात देखील 60 टक्के मतदान होताना हाणामारी आणि बाचाबाचीच्या घटना समोर आल्या होत्या. यात बागलवाडी येथे एका तरुणानं थेट ईव्हीएम मशीन जाळण्याचाही प्रयत्न केला. मात्र, सुदैवानं मशीनला कोणताही धोका न पोचल्यानं पुनर्मतदान घेण्याची वेळ आली नाही. दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी सभा घेतली होती. तर शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी जाहीर सभा घेतल्या होत्या.  


धैर्यशील मोहिते पाटील हे सध्या 30000 हून अधिक मतांनी आघाडीवर


सध्या माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे सध्या 30000 हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. ही आघाडी जर कायम राहीली तर धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, रणजितसिंह निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून विजयाचा दावा केला होता. मात्र, सध्या ते पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर-माढा-धारशीवमध्ये नेमकं काय घडतंय? कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?