Anupam Kher : अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) चंडीगढ विमानतळावर एका सीआयएसएफच्या जवानाने कानशिलात लगावली. त्यानंतर वातावरणही बरंच तापलं. अनेकांनी या घटनेचा निषेध करत कंगनाला समर्थन दिलं तर अनेकांनी यावर मौन बाळगणं पसंत केलं. यावर आता अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने मंडीतून विजय मिळवल्यानंतरही अनुपम खेर यांनी कंगनाचं अभिनंदन केलं होतं. 


देशाच्या महिलांसाठी ही गोष्ट अत्यंत निंदनीय असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. कंगनासोबत घडलेल्या या प्रकारावर शबाना आझमीसह अनेक बॉलीवूडच्या कलाकारांनी आक्षेप घेतला. पण कंगनाने तिला कोणाही समर्थन दिलं नसल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली होती. कंगनाच्या या प्रकरणाची सोशल मीडियावर देखील बरीच चर्चा झाली. 


अनुपम खेर यांनी काय म्हटलं? 


जो काही प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी आहे. असं घडायला नको होतं. त्यामुळे तुमचे जे काही वाद किंवा आक्षेप असतील ते बाहेरच्या बाहेर सोडवायला हवे होते. तुम्ही सुरक्षा रक्षक म्हणून ड्युटीवर असल्याचा फायदा घेऊन एका सुरक्षारक्षाकडून अशी वागणूक मिळणं हे अत्यंत निंदनीय आहे. यावर या देशातील महिलांनी याविरुद्ध आवाज उठवायला हवा. कारण कंगना फक्त खासदारच नाही तर या देशाची महिला सुद्धा आहे.  






कानशिलात लगावणाऱ्या जवान महिलेविरोधात एफआयआर


चंदिगड विमानतळावर कंगना रणौतच्या कानशिलात लगावणारी  महिला जवान कुलविंदर कौरविरोधात  एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, तिच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली नाही.  


कंगना रणौतचे प्रकरण काय आहे?


दिल्लीला जाण्यासाठी 6 जून रोजी कंगना रणौत मंडीहून चंदीगड विमानतळावर पोहोचली होती.  सुरक्षा तपासणीदरम्यान कंगना रणौतला सीआयएसएफची जवान  कुलविंदर कौरने तिच्या कानशिलात लगावली. कंगनाने शेतकरी आंदोलनादरम्यान महिला आंदोलकांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ कुलविंदरने कंगनाला मारले. कुलविंदरला सेवेतून निलंबित करण्यात आले असून तिची चौकशी होणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Kartik Aaryan : कार्तिक आर्यन पान मसाला आणि फेअरनेस क्रिमच्या जाहिराती का करत नाही ? अभिनेत्याने सांगितलं कारण