Kartik Aaryan On Pan Masala-Fairness Cream Ads: पान मसाला आणि फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींवरून कलाकारांना अनेकदा वादाला सामोरे जावे लागले आहे. अलीकडे, अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) देखील खुलासा केला की त्याला देखील फेअरनेस क्रीम आणि पान मसाल्याच्या जाहिरातींसाठी ऑफर येत आहेत परंतु तो त्या सर्व नाकारत आहे.कार्तिक आर्यन काही वर्षांपूर्वी फेअरनेस क्रीमची जाहिरात केली होती. यावरुन बराच गोंधळही झाला होता. त्यानंतर कार्तिकने अशा जाहिराती करणं बंद केलं. 


कार्तिक आर्यन हा लवकच चंदू चॅम्पियन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या याच सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कार्तिक व्यस्त आहे. प्रोमोशनदरम्यान कार्तिकने एका मुलाखतीमध्ये या विषयावर भाष्य केलं आहे. आता अशा प्रकारच्या जाहिराती करणंही बंद केलं असल्याचं कार्तिकने सांगितलं. 


'अनेक ब्रँडकडून ऑफर आल्या ज्या नाकारल्या'


द लॅलनटॉपशी बोलताना कार्तिकने या प्रश्नावर भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, मी फेअरनेस क्रिमच्या जाहिराती केल्या पण मी त्याच्याशी रिलेट करु शकत नाही. त्यामुळे त्या पुन्हा केल्याही नाहीत, कारण मला समजलं की हे चुकीचं आहे. त्यानंतर मला अनेक ब्रँड्सच्या ऑफर आल्या ज्या मी नाकारल्या. जसे सुपारी, पान मसाला ब्रँड वैगरे. माझा त्या गोष्टींशी संबंध नाही आणि मी शक्यतोवर या गोष्टी नाकारण्याचा प्रयत्न करतो.


इतर कलाकारांविषयी कार्तिकने काय म्हटलं?


यावेळी कार्तिकने अशा जाहिराती करणाऱ्या इतर कलाकरांविषयी देखील मत व्यक्त केलं आहे. त्यावर त्याने म्हटलं की,  'कोण बरोबर की चूक हे मी सांगू शकत नाही, प्रत्येकाची स्वतःची विचार करण्याची पद्धत असते. पण हे माझ्या विचारात बसत नाही.


कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल


सध्या कार्तिक आर्यन त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट 14 जून 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. याशिवाय अभिनेत्याकडे 'भूल भुलैया 3' आणि 'कॅप्टन इंडिया' देखील आहेत.                                                                


ही बातमी वाचा : 


Siddharth jadhav : जेव्हा राष्ट्रीय स्तरावर आपल्या कामाचं कौतुक केलं जातं..., सिद्धार्थ जाधवचा दिल्लीत बहुमान, अभिनेत्याने शेअर केली पोस्ट