Narendra Modi 3.0 Cabinet : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. तिसऱ्यांदा शपथ घेत मोदींनी हॅटट्रीक साधली आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली आहे. शिवाय, एनडीएतील घटक पक्षांसह देशाभरातील खासदार आणि बॉलिवडू सेलिब्रिटींनी पीएम मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 3.0 सरकारमध्ये कॅबिनेट कसे असेल जाणून घेऊयात.. कॅबिनेट तपशील पुढीलप्रमाणे... 72 मंत्र्यांनी मोदी 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळात शपथ घेतली आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वात, नवीन टीममध्ये 30 इतर कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले -
24 राज्यांमध्ये तसेच राज्यांमधील सर्व प्रदेशांचे प्रतिनिधीत्व
27 OBC, 5 अल्पसंख्याक , 10 SC, 18 वरिष्ठ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात असणार समावेश
- 27 OBC- 10 SC- 5 ST- 5 अल्पसंख्याक
- यापैकी 18 वरिष्ठ मंत्री मंत्रालयांचे नेतृत्व केले आहेत.
11 NDA मंत्र्यांकडे अनुभव आणि कौशल्य आहे.
केंद्रीय कामकाजाच्या अनुभवाची - संसदेत 3 किंवा त्याहून अधिक वेळा सेवा करणारे 43 मंत्री, 39 यापूर्वी भारत सरकारमध्ये मंत्री होते.
राज्यातील कामकाजाचा अनुभव -
अनेक माजी मुख्यमंत्री, 34 राज्य विधिमंडळात काम केलेले, 23 राज्यांमध्ये मंत्री म्हणून काम केलेले
कोणत्या नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ?
1. अमित शाह2. राजनाथ सिंह3. नितीन गडकरी4. निर्मला सीतारमन5. जे.पी. नड्डा 6. एस जयशंकर7. मनोहरलाल खट्टर 8. कुमारस्वामी9. पियुष गोयल 10. शिवराज सिंह चौहान11. धर्मेंद्र प्रधान12. जीतन राम मांझी13. राजीव रंजन सिंग उर्फ लल्लन सिंह 14. सर्वानंद सोनोवाल15. डॉ.वीरेंद्र कुमार 17. किंजरापूरा नायडू18. प्रल्हाद जोशी - मध्य प्रदेश (भाजप)19. जुएल ओराम20. गिरीराज सिंह
इतर महत्वाच्या बातम्या