एक्स्प्लोर

जलोटा म्हणतात जसलीनसोबत मी लग्न करणारच नव्हतो

गझलनवाज अनुप जलोटा यांना जसलीनवरून वारंवार विचारलंही गेलं. त्यानंतर पुन्हा एकदा यांचा नातेसंबंध प्रकाशात आला आहे. त्याला कारणीभूत ठरलं आहे अनुप जलोटा आणि जसलीन यांचं फोटोशूट.

मुंबई : बिग बॉसच्या सीझनमधून काय समोर येईल याची शाश्वती नसते राव. काहीही होऊ शकतं. आपल्या मराठी बिग बॉसमध्ये काय काय बघायला मिळतं. तिथे अफेअर्स होता.. भांडणं होतात.. जवळीक निर्माण होते.. काहीही होतं. मराठीची ही अवस्था तिथे हिंदीचं काय सांगावं. हिंदीचा बिग बॉस येणार असला की काहीतरी खमंग बघायला मिळणार ही हमी असते.

गेल्या वर्षीचा बिग बॉसचा सीझनही असाच खुसखुशीत होता. आणि हा सीझन गाजवला होता तो अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांनी. अवघ्या तिशीतली जसलीन आणि पासष्ठीचे अनुप जलोटा यांच्या लीला पाहून प्रत्येक दर्शक अवाक झाला होता. गझलनवाज अनुप जलोटा यांना जसलीनवरून वारंवार विचारलंही गेलं. त्यानंतर पुन्हा एकदा यांचा नातेसंबंध प्रकाशात आला आहे. त्याला कारणीभूत ठरलं आहे अनुप जलोटा आणि जसलीन यांचं फोटोशूट.

जसलीन आणि अनुप जलोटा यांनी एक वेडिंग फोटोशूट केलं आहे. त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावर अनुप जलोटा यांना विचारल्यावर ते म्हणतात, 'जसलीनसोबत मी लग्न करणार नव्हतोच. आत्ता कशाला माझं वय जर 35 असतं तरीही मी तिच्यासोबत लग्न करणार नव्हतो. कारण तिचं राहणीमान वेगळं आहे. तिची ड्रेसिंग स्टाईल.. तिचा वावर पाहता ती माझ्या कुटुंबात येणं शक्यच नव्हतं. आता त्या फोटोचं म्हणाल तर ते आम्ही फोटोशूट केलं होतं. ते फोटो आता व्हायरल झाले आहेत.

अनुप जलोटा बिग बॉसच्या सीझनमध्ये बरेच गाजले होते. त्यांच्य जसलीनसोबतच्या गप्पा चवीचवीने पाहिल्या जात होत्या. बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर त्यांना याबाबत विचारलंही गेलं होतं तेव्हाही त्यांनी आपल्या जसलीनसोबतच्या संबंधांचा इन्कार केला होता. पण वेडिंग फोटोशूट पुन्हा व्हायरल झाल्यावर ही चर्चा पुन्हा होऊ लागली.

महत्त्वाच्या बातम्या

तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
Embed widget