एक्स्प्लोर

Anshuman Vichare On Maharashtrachi Hasyajatra Show: 'माझी एक्सपायरी डेट जवळ आलीय...'; प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं खरं कारण

Anshuman Vichare On Maharashtrachi Hasyajatra Show: प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अभिनेता अंशुमन विचारे यानं सांगितलं खरं कारण. नेमकं काय म्हणाला?

Anshuman Vichare On Maharashtrachi Hasyajatra Show: सूंपर्ण महाराष्ट्राला (Maharashtra News) खळखळून हसवणारा शो म्हणजे, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra). या शोमधून घराघरांत पोहोचलेला मराठमोळा अभिनेता (Marathi Actor) अंशुमन विचारे (Anshuman Vichare) नेहमीच चर्चेत असतो. तो त्याचे वेगवेगळे अनुभव, व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करत असतो. हास्यजत्रेतून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या अंशुमन विचारेनं कोरोना लॉकडाऊनमध्ये (Corona Lockdown) अचानक हा शो सोडला. त्यावेळी चाहत्यांना जोरदार धक्का बसलेला. अंशुमननं अशा तडकाफडकी निर्णय का घेतला? नेमकं त्याच्यासोबत काय झालेलं? याचा त्याला नेम लागेना. अशातच, आता कित्येक वर्षांनी त्यावेळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra Show) सोडण्याचं खरं कारण सांगितलं आहे. तसेच, त्यानंतर फारसा कुठेच न दिसलेल्या  अंशुमन विचारेनं तिसरं घर कसं घेतलं? असा प्रश्नही चर्चेत होता. त्याबद्दलही अभिनेत्यानं खुलासा केला आहे.  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता अंशुमन विचारे यानं नुकतीच 'इट्स मज्जा' युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्यावेळी त्यानं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम का सोडला? याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना काळात त्यानं हा निर्णय का घेतला? याबाबत त्यानं सर्वकाही सांगितलं आहे. 

अभिनेता अंशुमन विचारे नेमकं काय म्हणाला? (Anshuman Vichare On Maharashtrachi Hasyajatra)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अंशुमन विचारे म्हणाला की, "माझं पहिलं घर होतं काजूपाड्यात जे माझ्या वडिलांच होतं. त्यानंतर मी स्वत:च्या पैशाने गोराईत माझं पहिलं घर घेतलं. सीवडूच्या मागे होतं ते. त्यावेळी माझं सगळं छान चालेलं. इव्हेंट्स वगैरे चालू होते त्यामुळे पैसेही भरपूर मिळत होते. त्या पैशाने मी पुण्यात पिंपरी चिंचवड इथल्या सांगवी येथे दुसरं घर घेतलं. तो मोठा फ्लॅट होता. मग करोना सुरू झाला. त्यावेळी आमचं बबनचं शूट चालू झालं होतं. मी फॅमिली सोडून जाणार नव्हतो. तेव्हा माझ्या मनात कुठेतरी जाणीव झाली की आपण जे काही स्किट वगैरे करतोय, रिअलिटी शो करतोय त्यावरुन एक्सपायरी डेटकडे येत चाललो आहोत. आपल्याकडून तेच तेच काम होतय. मला थांबायला हवं असा विचार करुन मी ब्रेक घेतला."

"...माझी आता ना एक्सपायरी डेट जवळ आली"

"दुसरी गोष्ट मला असं वाटायला लागलं होतं, माझी आता ना एक्सपायरी डेट जवळ आली आहे. ज्या स्किट्स करतोय आपण, ज्या रिऍलिटी शोमध्ये काम करतोय आपण, तेच तेच करतोय आपण. मग मी ब्रेक घेतला. पण हे क्रेडिट मी माझ्या बायकोला देईन, कारण मी म्हटलं तिला "मी ब्रेक घेतोय, कोरोना आहे, पुढचं कसं काय ? हफ्ते द्यायचे आहेत, आपल्याला नव्या घराचे..." त्यावेळी 48000 रुपये हफ्ता होता नव्या घराचा. ती म्हणाली, "काही हरकत नाही. तुला नाही करायचं आहे ना. आपण आमटी भात खाऊ, खिचडी खाऊ मस्त. काही प्रॉब्लेम नाही. तू काम कर मस्त..." मी तेव्हा सगळा वेळ माझ्या मुलीला दिला. तेव्हा ती एक दीड वर्षाची होती...", असं अंशुमन विचारे म्हणाला. 

पुढे बोलताना अंशुमन विचारे म्हणाला की, "पण नंतर असं झालं की, मी एक दीड वर्ष काहीच काम करत नव्हतो. छोटं मोठं तरी काहीतरी करायचो. करोनामध्ये क्वारंटाइन शूट केलं. मात्र त्यामुळे माझ्या हप्त्याची गणित बिघडायला लागली. त्यामुळे जबरदस्ती ते पुण्याचं घर विकावं लागलं. ते घर विकल्याचं मला खूप वाईट वाटलं, कारण खूप छान घर बनवलेलं ते. पुढे करोना संपल्यावर 2 वर्षांनी मी ठाण्याला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. ठाण्याचं कल्चर, तिथलं वातावरण मला खूप आवडतं... त्यामुळे मग गोराईचं घर काढून मी हे घर घेतलं. असं हे माझं तिसरं घर आहे..."  

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Maharashtrachi HasyaJatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकारांचं मानधन नेमकं किती असतं? अभिनेता पृथ्वीक प्रतापने थेट आकडाच सांगितला...

ABP Majha च्या बातम्या LIVE:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget