Facebook Pregnancy Job Scam : भारतात गेल्या काही वर्षांपासून स्कॅम (Facebook) आणि फसवणुकीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. विविध पद्धतींचा अवलंब करून फसवणूक करणाऱ्यांकडून आणि हॅकर्सकडून लोकांना त्रास दिला जात आहे. केवळ मेसेज, ओटीपी किंवा लिंकवर क्लिक करूनच नव्हे तर इतर मार्गांनीही (Cyber Crime) लोक स्कॅमर्सचे शिकार होतात, पण अलीकडे फेसबुकवर 'ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्व्हिस'(Facebook Pregnancy Job Scam)  नावाचा नवा स्कॅम झपाट्याने पसरत आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हा घोटाळा आणि तुम्ही तो कसा टाळू शकता. पाहुयात...


काय आहे हा Facebook प्रेग्नंसी स्कॅम ?


फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिलेने सांगितले आहे की, ती विवाहित आहे, पण पतीच्या तब्येतीच्या समस्येमुळे तिला मुले होऊ शकत नाहीत. मुल होण्यासाठी  जो पुरुष  मदत करु शकतो, अशा  पुरुषाला ही महिला 10 लाख रुपये देण्यास तयार आहे. व्हिडिओच्या शेवटी एका पुरुषाचा आवाज या संपूर्ण गरोदरपणाच्या नोकरीबद्दल आणि एखादी व्यक्ती त्याचा कसा फायदा घेऊ शकते याबद्दल सांगताना दिसते. 


Facebook स्कॅमला अनेक जण बळी पडले!


आतापर्यंत अनेक जण या स्कॅमला बळी पडले आहेत. बिहार पोलिसांनी या प्रकरणात जवळपास आठ जणांना अटक केली आहे. असे असूनही या स्कॅमला प्रोत्साहन देणारी अनेक फेसबुक पेजेस अजूनही सुरू आहेत. पैशाच्या हव्यासापोटी अनेकजण हजारो रुपये गमावतात आणि अनेकदा तक्रार दाखल करण्यासही लाजतात.


स्कॅम  झाल्यास काय करावे?


तुम्हीही अशा स्कॅम ला बळी पडला असाल तर ताबडतोब पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर जाऊन तक्रार करा. सायबर क्राईमच्या प्रकरणांवर तक्रार दाखल करण्यासाठी खास पोर्टल तयार करण्यात आलं आहे. 


तक्रार करण्यासाठी स्टेप्स फॉलो करा...



-जर तुमच्यासोबत सायबर क्राईमशी संबंधित एखादी घटना घडली असेल, ज्यासाठी तुम्हाला तक्रार दाखल करायची असेल तर तुम्हाला आधी https://cybercrime.gov.in/ जावे लागेल.


-वेबसाईटवर गेल्यानंतर होमपेजवरील File a complaint  ऑप्शनवर क्लिक करा.


- अटी आणि शर्ती स्वीकारा आणि पुढच्या पेजवर जा.


- यानंतर Report other cybercrime  बटणावर टॅप करा.


-यानंतर citizen login पर्यायावर टॅप करा आणि नाव, ईमेल आणि फोन नंबर सारखे तपशील भरा. 


-यानंतर तुमच्या रजिस्टर्ड फोन नंबरवर ओटीपी येईल, कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट बटण दाबा.


-पुढच्या पानावर तुम्हाला General Information, Cybercrime Information, Victim Information आणि Preview असे चार सेक्शन दिसतील, प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला आवश्यक डिटेल्स भरावे लागतील.


-माहिती भरल्यानंतर एकदा वाचा आणि नंतर सबमिट बटण दाबा, त्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर पोहोचाल जिथे तुम्हाला घटनेशी संबंधित स्क्रीनशॉट किंवा फाईल्स शेअर कराव्या लागतील. 


-सर्वा माहिती भरल्यानंतर Save and Next सेव्ह आणि नेक्स्ट वर टॅप करा.


-जर तुम्हाला कुणावर संशय आला असेल तर तुम्हाला पुढील पेजवर याची माहिती द्यावी लागेल. माहितीची पडताळणी केल्यानंतर सबमिट बटण दाबा. तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला एक मेसेज आणि ईमेल येईल ज्यामध्ये तुम्हाला तक्रार आयडी आणि इतर तपशील लिहून मिळतील.


इतर  महत्वाची बातमी-


iPhone 14 Discount : फ्लिपकार्टवर iPhone 14 वर बंपर डिस्काउंट; 60,000 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता iPhone 14