Karisma Kapoor Married Life : अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) नव्वदीच्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. करिश्मानाच्या सिनेमांना चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळत होता. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते तिच्यासोबत सिनेमा करण्यासाठी आतूर होते. करिश्माची (Karisma Kapoor) व्यावसायिक कारकिर्द, करियर जितके यशस्वी होते, त्यापेक्षा अनेक पटींनी वैवाहिक आयुष्य ह्रयदद्रावक होते. तिने विवाह केला. पण हा विवाह तिच्यासाठी जखमा देणाराच ठरला. बॉलिवूडमध्ये नेहमी हसतमुख राहिलेल्या करिश्मा कपूरच्या व्यक्तीगत आयुष्यात काय घडलं जाणून घेऊयात...


भळभळत्या जखमा देणारे वैवाहिक आयुष्य 


करिश्माची (Karisma Kapoor) व्यावसायिक कारकिर्द, करियर जितके यशस्वी होते, त्यापेक्षा अनेक पटींनी वैवाहिक आयुष्य ह्रयदद्रावक होते. अभिनेत्री करिश्मा कपूरने 2003 मध्ये उद्योगपती संजय कपूरशी विवाह केला होता. विवाह करण्यापूर्वी करिश्माने अनेक स्वप्न पाहिले होते. मात्र, लग्नाच्या पहिल्याच रात्री सर्व स्वप्नांचा चक्काचूर झाला. विवाह झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पतीचा खराखुरा चेहरा तिच्यासमोर आला. संजय कपूरशी विवाह करणे, हीच तिची सर्वांत मोठी चूक ठरली होती. पती पासून सासू-सासरे अशा अनेकांनी जखमा दिल्या, असा दावाही करिश्माने केला होता. 


'लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीने केला लिलाव'


एका मुलाखतीदरम्यान, करिश्मा कपूरने (Karisma Kapoor) मोठा खुलासे केले होते. करिश्मा कपूर म्हणाली होती की, लग्नानंतर संजय कपूर माझ्यासोबत फार चुकीच्या पद्धतीने वागत होते. लग्नाच्या पहिल्या रात्री संजय कपूरने मला मित्रांसोबत वेळ घालवण्यास मजबूर केले होते. एवढेच नाही तर संजयने त्याच्या मित्रांना करिश्मासोबत वेळ घालवण्यास किती किंमत मोजावी लागेल? हे देखील स्पष्टपणे सांगितले होते. दरम्यान, करिश्माने या गोष्टींना विरोध करताच संजय कपूरने मारहाण करण्यास सुरुवात केली होती. 


प्रेग्नंट असताना करिश्माला सासूने कानशिलात लगावली


करिश्मा कपूर (Karisma Kapoor) पुढे बोलताना म्हणाली, गरोदर असताना मला माझ्या सासूने कानशिलात लगावली होती. शिवाय संजयने त्याचा भावाला करिश्मावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. यादरम्यान करिश्माला एक मुलगा आणि एक मुलगी देखील झाली. दोन मुलं झाल्यानंतरही करिश्मा आणि संजय यांच्या नात्यात सुधारणा झाली नाही. 


2016 मध्ये संजय-करिश्माचा घटस्फोट 


शेवटी सहनशीलतेचा अंत आलाच करिश्माने (Karisma Kapoor) घटस्फोट घ्यायच पक्क केलं. विवाहाच्या 12 वर्षानंतर करिश्माने संजय कपूरशी घटस्फोट घेतला. हा घटस्फोटही सोप नव्हता. संजय कपूरने करिश्मावर पैशासाठी विवाह केला, असा आरोप केला होता. तर करिश्मानेही संजयवर गंभीर आरोप केले होते. शिवाय, संजयने केलेल्या हिंसाचाराबाबत तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने दोघांसमोर काही अटी ठेवल्या आणि घटस्फोट मंजूर केला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


VIDEO: 31 व्या वर्षी बिझनेसमॅनशी लग्न करणार अभिनेत्री; बॅचरल पार्टीमधला 'टॉवेल डान्स' पाहून होणारा पती म्हणाला, "किती प्यायलीस?"