एक्स्प्लोर

'करिअर की सुनीता?', अनिल कपूर यांनी सांगितली आपली भन्नाट लव्हस्टोरी

अनिल कपूर यांनी एक पोस्ट शेअर करताना आपली पत्नी सुनीता कपूर (Sunita Kapoor) यांच्यासोबतचा एक फोटो टाकला आहे आणि सोबत एक ऑडीओ सुद्धा टाकलाय, ज्यामध्ये ते आपल्या लव्ह स्टोरी आणि प्रपोजल बद्दल माहिती देत आहेत.

मुंबई : अनिल कपूर (Anil Kapoor) आणि सुनीता कपूर (Sunita Kapoor) यांचा काल 19 मे रोजी लग्नाचा वाढदिवस होता. आपल्या वेडिंग अॅनिव्हर्सरी दिवशी अनिल कपूर यांनी ट्विटरवर आपली लव्ह स्टोरी शेअर केली आहे. यावेळी त्यांनी सांगितलंय की, त्यांच्यासाठी वेडिंग अॅनिव्हर्सरीपेक्षा प्रपोजल अॅनिव्हर्सरी अधिक महत्वाची आहे. आम्ही वेडिंग अॅनिव्हर्सरीसोबतच प्रपोज केलेला दिवस प्रपोजल अॅनिव्हर्सरी म्हणून साजरा करतो, असं अनिल कपूर यांनी सांगितलंय. त्यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर करताना आपली पत्नी सुनीता कपूर (Sunita Kapoor) यांच्यासोबतचा एक फोटो टाकला आहे आणि सोबत एक ऑडीओ सुद्धा टाकलाय, ज्यामध्ये ते आपल्या लव्ह स्टोरी आणि प्रपोजल बद्दल माहिती देत आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये अनिल कपूर यांनी म्हटलंय की, त्याकाळी 17 मे ही तारीख माझ्यासाठी फार महत्त्वाची होती. कारण त्या रात्रीपासून माझ्या लव्ह स्टोरीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. 17 मे रोजी मी एक मोठ्या प्रोजेक्टचा चित्रपट साइन केला होता. आणि दुसऱ्याच दिवशी 18 मे रोजी सुनिताला लग्नाची मागणी घातली होती. हे दोन्ही दिवस माझ्यासाठी आनंदाचे होते, मात्र तितकेच पेचात पाडणारेही होते. कारण मी एक एक पावलं पुढे चालत होतो, परंतु असा एक क्षण आला जेथे मला प्रेम किंवा करिअर या दोघांपैकी एकाची निवड करायची होती. मात्र मी माझ्या प्रेमाची निवड केली, असं अनिल कपूर यामध्ये म्हणतात. अनिल कपूर यांचा फिटनेस आणि चेहऱ्यावरील हसू तरुणांना लाजवेल असंच आहे. जबरदस्त अभिनय, काम करण्याची जिद्द याच्या बळावर त्यांनी एक वेगळी ओळख बनवली आहे. आजही ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. मात्र एक काळ असा होता जेव्हा त्यांना अभिनय किंवा प्रेम या दोघांपैकी एकच गोष्टी निवडायची होती. या कठीण प्रसंगामध्ये अनिल कपूर ठाम राहिले आणि त्यांनी एक अचूक निर्णय घेतला, ज्यामुळे आज त्यांच्यासोबत अभिनय आणि त्यांचं प्रेम अर्थात पत्नी सुनिता कपूरदेखील आहेत. या प्रसंगाबाबत त्यांनी आपल्या भावना ट्वीट करत व्यक्त केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Satluj Ban Controversy: असंख्य सेन्सॉर कट, सरकारचा प्रचंड दबाव; रिलीजनंतर 'सतलज ' 48 तासांत OTTवरून हटवला, मंत्रालयातून आलेलं बंदीचं पत्र; दिग्दर्शकाचे धक्कादायक गौप्यस्फोट
असंख्य सेन्सॉर कट, सरकारचा प्रचंड दबाव; रिलीजनंतर 'सतलज ' 48 तासांत OTTवरून हटवला, मंत्रालयातून आलेलं बंदीचं पत्र; दिग्दर्शकाचे धक्कादायक गौप्यस्फोट
Sayaji Shinde On Emotional Memory With Ajit Pawar: 'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा
'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा
Alpha Box Office Collection: सगळ्यांनी फ्लॉप ठरवलं, पण 12 व्या दिवशी 'अल्फा'नं केला मोठा गेम; कमाईत अनपेक्षित उडी, आतापर्यंत किती कमावले?
सगळ्यांनी फ्लॉप ठरवलं, पण 12 व्या दिवशी 'अल्फा'नं केला मोठा गेम; कमाईत अनपेक्षित उडी, आतापर्यंत किती कमावले?
Aamir Khan Gauri Spratt Wedding: 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Supreme Court Pulls Up Patna High Court: सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
Aamir Khan Gauri Spratt Wedding: 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
Embed widget