Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Mechant) यांच्या लग्नासाठी आता काही तासच राहिले आहेत. या दोघांच्या लग्नानिमित्ताने सुरू असलेल्या विधींना सुरुवात झाली आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने अंबानी कुटुंबासह राधिका मर्चंटच्या कुटुंबावर लोकांच्या नजरा खिळल्या आहेत. राधिका मर्चंटची आई आणि नीता अंबानी यांची विहीण शैला मर्चंट यांनी गुलाबी साडीतल्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. 


मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानी शिव शक्ती पूजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मर्चंट कुटुंबियांनी हजेरी लावली होती.  नीता अंबानी यांच्या विहिण शैला मर्चंट यांनी गुलाबी साडीवर पाचूचा नेकलेस परिधान केला होता.  
 


पिंक कलरची बनारसी साडी...


शैला मर्चंट यांनी शिवशक्ती पूजेसाठी गुलाबी रंगाची बनारसी साडी नेसली होती. ज्यावर सोनेरी रंगाची फुलांची वेल, पान, घोडे आणि हत्तीची डिझाइन होती. यामुळे साडीला एक अनोखा टच मिळाला होता. राधिकाच्या आईने गुजराती स्टाईलमधला पदर घेतला होता. त्यावर फुल-पानांच्या वेलींनी सोनेरी बॉर्डर होती, यामुळे त्यांचा लूक आणखीच सुंदर दिसत होता.


शैला मर्चंट यांनी डिझायनर साडीसोबत मॅचिंग ब्लाउज घातला होता. ज्याच्या अर्ध्या बाहीवर फुलांच्या वेली होत्या. शैलाने  त्यांच्या या ब्लाउजची डिझाईन अगदी साधी ठेवली होती.






गळ्यात पाचूचा हार...


अगदी  सिंपल डिझाइनमध्ये ही शैला या आपल्या विहिणबाई नीता अंबानी यांच्या सौंदर्याला टक्कर देताना दिसल्या.  शैला मर्चंट या शिव-शक्ती पूजेत पाचूंचा नेकलेस परिधान करून सहभागी झालेल्या. 
राधिकाच्या आईने तिचा लूक साधा ठेवला असला तरी सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. 


गोल्डन कलरची पादत्राणे


शैला मर्चंट यांनी या साडीवर फूटवेअर म्हणून गोल्डन कलरचे लेडीज शू निवडले होते. साडीवर हे  गोल्डन कलरचे शूज शोभून दिसत होते. शैला मर्चंट यांनी डोळ्यात काजळ, कपाळावर टिकली, न्यूड लिपस्टिकसह आपला लूक पूर्ण केला होता. 


इतर संबंधित बातमी :