Anant Ambani-Radhika Merchant Pre-wedding : जगभरात सध्या एका आलिशान सोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या दुसऱ्या प्री वेडिंग सोहळ्याचा विषय सगळीकडे गाजतोय. पहिल्या प्री वेडिंगनंतर परदेशात दुसऱ्या प्री वेडिंगचा सोहळा रंगतोय. या दुसऱ्या प्री वेडिंगसाठीही जगभरातील दिग्गज पाहुणे मंडळी पोहचली आहेत. आता याच सोहळ्यातला पहिला व्हिडिओ समोर आला आहे.
अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री वेडिंगचा सोहळा हा 29 मे रोजी सुरु झाला. तो 31 मे रोजी संपणार आहे. त्यासाठी सेलिब्रेटी देखील क्रूजवर पोहचले आहेत. नुकतच या क्रूजवरचा पहिला व्हिडिओ समोर आला असून यामध्ये अमेरिकन बँड 'बॅकस्ट्रीट बॉईज' धमाकेदार परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये हे लोक 'बॅकस्ट्रीट्स बॅक' गाताना दिसत आहेत. मात्र, व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचा विश्वास बसत नाही की हे बॅकस्ट्रीट बॉईज आहेत का? असे सांगितले जात आहे की या व्हिडिओमध्ये दिसणारे कलाकार बॅकस्ट्रीट बॉईज आहेत, ज्यात निक कार्टर, हॉवी डोरो, ब्रायन लिट्रेल, एजे मॅक्लिन आणि केविन रिचर्डसन यांचा समावेश आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या पहिल्या प्री-वेडिंगच्या चर्चा आजही सुरू आहेत. अशातच आता त्यांना दुसऱ्या प्री-वेडिंगचं आयोजन केलं आहे. जामनगरात पार पडलेल्या पहिल्या प्री-वेडिंगनंतर परदेशात दुसरं प्री-वेडिंग पार पडणार आहे. 29 मे पासून इटलीमध्ये अनंत-राधिकाच्या दुसऱ्या ग्रँड प्री-वेडिंगचं आयोजन करण्यात आलं आहे. समुद्रकिनारी क्रूझवर अंबानी कुटुंबीय आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत आहेत. सेकंड प्री-वेडिंगला बॉलिवूडसह हॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे. दिग्गज कलाकार मंडळी मैफिलीला चारचाँद लावण्यासाठी सज्ज आहेत. पहिल्या प्री-वेडिंगप्रमाणे दुसरं प्री-वेडिंगदेखील थीम बेस्ड आहे.
शाही थाटात पार पडणार दुसरं प्री-वेडिंग
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगचं आयोजन करण्यात आलं आहे. लग्झरी क्रूजवर या पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रूझवर पार पडणाऱ्या या प्री-वेडिंगला बॉलिवूडसह जगभरातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावली आहे. 29 मे ते 1 जूनदरम्यान फ्रान्समध्ये अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग पार पडत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट 12 जुलै 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. मनोरंजन, राजकारण, उद्योग, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मंडळी त्यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगला आणि लग्नाला हजेरी लावणार आहेत.