एक्स्प्लोर

Star Pravah Marathi Serial Anandi: भूमिकेसाठी कायपण! मालिकेतलं महत्त्वाचं वळण साकारण्यासाठी 'आनंदी' बनणार जिवंत शिल्प PHOTOs

Star Pravah Marathi Serial Anandi: पॅरिसहून आलेल्या महत्त्वाच्या पाहुण्यांसाठी युगंधरनं खास भेटवस्तू म्हणून एक दुर्मिळ आणि आकर्षक मूर्ती आणली होती. मात्र, अनावधानानं आनंदीच्या हातून ती मूर्ती फुटते आणि मग जे आनंदी करते, ते खरंच थक्क करणारं आहे.

Star Pravah Marathi Serial Anandi: स्टार प्रवाहवरील (Star Pravah) आनंदी मालिकेला (Marathi Serial Anandi) प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेतील रंजक कथानक आणि अनपेक्षित वळणांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायम वाढत आहे. लवकरच मालिकेत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि थरारक वळण पाहायला मिळणार आहे, ज्यासाठी आनंदी बनणार आहे, जिवंत शिल्प.

Star Pravah Marathi Serial Anandi: भूमिकेसाठी कायपण! मालिकेतलं महत्त्वाचं वळण साकारण्यासाठी 'आनंदी' बनणार जिवंत शिल्प PHOTOs

पॅरिसहून आलेल्या महत्त्वाच्या पाहुण्यांसाठी युगंधरनं खास भेटवस्तू म्हणून एक दुर्मिळ आणि आकर्षक मूर्ती आणली होती. मात्र, अनावधानानं आनंदीच्या हातून ती मूर्ती फुटते. या घटनेमुळे युगंधरची पाहुण्यांसमोर मानहानी होऊ नये आणि त्याच्या व्यवसायावर परिणाम होऊ नये, म्हणून आनंदी एक धाडसी निर्णय घेते. फुटलेल्या मूर्तीच्या जागी ती स्वतःच उभी राहण्याचा निर्णय घेते.

Star Pravah Marathi Serial Anandi: भूमिकेसाठी कायपण! मालिकेतलं महत्त्वाचं वळण साकारण्यासाठी 'आनंदी' बनणार जिवंत शिल्प PHOTOs

मालिकेतील हा प्रसंग जितका आगळावेगळा आहे, तितकीच मेहनत तो पडद्यावर साकारण्यासाठी घेण्यात आली आहे. आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जाई खांडेकर (Jaaee Khandekar) हिला हुबेहुब जिवंत शिल्पाचा लूक देण्यासाठी तब्बल चार तासांची मेहनत घेण्यात आली. त्वचेला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, विशेष प्रकारचे स्किन-फ्रेंडली रंग वापरण्यात आले. मेकअप, वेशभूषा आणि बॉडी पेंटिंगच्या मदतीनं जाईला जिवंत शिल्पासारखं वास्तववादी रूप देण्यात आलं. 'आनंदी' (Anandi Serial) मालिकेच्या संपूर्ण टीमनं यासारखी प्रचंड मेहनत घेतली आहे.

Star Pravah Marathi Serial Anandi: भूमिकेसाठी कायपण! मालिकेतलं महत्त्वाचं वळण साकारण्यासाठी 'आनंदी' बनणार जिवंत शिल्प PHOTOs

या अनुभवाविषयी सांगताना अभिनेत्री जाई खांडेकर म्हणाली, "मालिकेत मी आजवर अनेक वेगवेगळे प्रसंग साकारले आहेत, पण जिवंत शिल्प बनण्याचा हा अनुभव खूपच वेगळा आणि आव्हानात्मक होता. जवळपास चार तास एकाच जागी बसून मेकअप करावा लागला. त्यानंतर शूटिंगदरम्यान बराच वेळ स्थिर उभं राहण्याची कसरतही होती. हा प्रसंग साकारणं कठीण होतं. मात्र प्रेक्षकांना काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे, याचा आनंद आहे. कलाकार म्हणून अशा आव्हानात्मक गोष्टी साकारायला मिळत आहेत, याचाही आनंद आहे..."

Star Pravah Marathi Serial Anandi: भूमिकेसाठी कायपण! मालिकेतलं महत्त्वाचं वळण साकारण्यासाठी 'आनंदी' बनणार जिवंत शिल्प PHOTOs

आनंदीचं हे अनोखं जिवंत शिल्पाचं रूप आणि तिचा त्याग युगंधरचा मान राखण्यात यशस्वी ठरेल का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तसेच, मालिकेत आता यापुढे 'आनंदी' समोर कोणती आव्हानं येणार? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Actress Jewel Mary Slams Rumours: 'मी मेलेले नाहीय...', प्रसिद्ध अभिनेत्री हयात असतानाच अंत्यविधीचे कार्ड व्हायरल, संतापली, चिडली, म्हणाली...

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Embed widget