अमिषा पटेलचा व्हॉट्सअॅप नंबर व्हायरल झाला? अभिनेत्रीची इन्स्टाग्रामवर पोस्ट, म्हणाली हा नंबर..
Amisha Patel Warns Fans About Fake WhatsApp Scam: अमिषा पटेलच्या नावाने व्हॉट्सअॅपवरून फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला. तिनं सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना सावध केलं.

Amisha Patel Warns Fans About Fake WhatsApp Scam: आजकाल ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ओळखीचे असल्याचे भासवून अनोळखी नंबरवरून कॉल किंवा मेसेज करून अनेकांची फसवणूक केली जात आहे. अशाच एका फसवणुकीच्या प्रकारात अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अमिषा पटेलला याबाबत माहिती मिळताच तिनं पोस्ट शेअर करून जनतेला आवाहन केलं आहे. सध्या अमिषाची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तिनं पोस्ट शेअर करून चाहत्यांना सावध केलं आहे.
अमिषा पटेलच्या नावानं लोकांची फसवणूक?
काही लोकांना एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅप मेसेज आले होते. या नंबरच्या व्हॉट्सअॅप डिपीवर अमिषा पटेलचा फोटो होता. या फोटोवर तिनं लाल ड्रेस परिधान केला होता. अमिषा पटेल असे सांगून या नंबरवरून अनेकांना मेसेज आला होता. अमिषा पटेलला कळताच तिनं हा नंबर तिचा नसल्याचं स्पष्ट केलं. अमिषाने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना हा नंबर ब्लॉक करण्याचं आवाहन केलं.
अमिषा पटेलची इन्स्टाग्रामवर पोस्ट
View this post on Instagram
अमिषा पटेलने सशोल मीडियावर या संबंधित एक पोस्ट लिहिली. तसेच या नंबरचा स्क्रीनशॉट शेअर केला. अमिषाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एका स्क्रीनशॉट शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं की, "हा नंबर बनावट आहे. हा माणूस फसवा आहे. तो लोकांना फसवत आहे. हा व्हॉट्स नंबर माझा नाही", असं तिनं स्पष्ट केलं. आमिषाने ही पोस्ट शेअर करत चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना सावध केलं.
अमिषा पटेलचा चाहतावर्ग मोठा
कामाच्या बाबतीत, आमिषा 2023 साली प्रदर्शित झालेल्या गदर 2 या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला. अमिषाने २००० मध्ये "कहो ना प्यार है" या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात हृतिक रोशननेही मुख्य भूमिका साकारली होती. या जोडीसह या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. या चित्रपटानंतर अमिषाच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. अमिषा सोशल मीडियात प्रचंड चर्चेत असते.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
वडील वारले.., अजय-अतुल शोकात तरीही.. तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला, हे गाणं कसं तयार झालं?
























