मुंबई : रशियन मॉडेल ग्रेटा वेडलरचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळला. 23 वर्षीय ग्रेटा सुमारे वर्षभरापासून बेपत्ता होती. पण तिचं सोशल मीडिया अकाऊंट अॅक्टिव्ह होते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा उल्लेख 'मनोरुग्ण' असा केल्यानंतर ग्रेटा चर्चेत आली होती.
मॉडेल ग्रेटा वेडलरची हत्या तिचा एक्स-बॉयफ्रेण्ड दिमित्री कोरोविनने केली. कोरोविनने ग्रेटाचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरुन कारच्या डिक्कीत ठेवला. कोरोविनने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ग्रेटा वेडलरला 300 मैल अंतराव असलेल्या लिपेट्स्क इथे घेऊन गेला. तिथे तिची हत्या करुन मृतदेह सुटकेसमध्ये भरला. ही सुटकेस गाडीच्या डिक्कीत ठेवून तसाच निघून गेला.
पैशांच्या वादातून हत्या
पैशांच्या वादातून ग्रेटा वेडलरचा खून केल्याचं दिमित्री कोरोविनने आपल्या कबुली जबाबात म्हटलं. या हत्येचा आणि ग्रेटाच्या राजकीय वक्तव्याचा कोणताही परस्पर संबंध नाही. कोरोविनने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की, एका हॉटेलच्या खोलीत त्याने तीन रात्री ग्रेटा वेडलरच्या मृतदेहासोबत काढल्या होत्या.
ग्रेटाच्या मृत्यूनंतर दिमित्री कोरोविनच तिचं सोशल मीडिया अकाऊंट अपडेट करत होता, जेणेकरुन तिचा मृत्यू झाल्याची किंवा ती बेपत्ता असल्याचा संशय कोणाला येऊ नये. सध्या ग्रेटाच्या एक्स बॉयफ्रेण्डने हत्या केल्याची कबुली दिली आहे. तर त्याच्या माहितीवरुन मृतदेह देखील ताब्यात घेण्यात आला आहे.
पुतीन यांच्यावरील आणि ग्रेटाच्या मृत्यू संबंध नाही
जानेवारी 2021 मध्ये केलेल्या पोस्टमध्ये पुतीन यांच्यावर टीका करताना ग्रेटा म्हणाली होती की, "केजीबीच्या माजी अधिकाऱ्यावर टीका करताना पुतीन यांनी "स्पष्ट मनोरुग्णता किंवा समाजोपचार" दर्शवल्याचं वेडलर म्हणाली होती. एका मेसेजमध्ये तिने म्हटलं होतं की, "कदाचित पुतीन यांना खरोखरच रशियाची अखंडता वाढवायची आहे आणि रशियन लोकांसाठी मनापासून शुभेच्छा आहेत. पण ते खरोखर काही करु शकतात का?"
दरम्यान, युक्रेनसोबत युद्ध सुरु असतानाच रशियन मॉडेल ग्रेटा वेडलरचा मृतदेह सापडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. ग्रेटाने एक वर्षापूर्वी अध्यक्ष पुतीन यांच्यावर सार्वजनिकरित्या टीका केली होती आणि त्यानंतरच ती बेपत्ता झाली होती. आता तिचा मृतदेह मिळाला असून मारेकऱ्यानेही गुन्हा कबूल केला आहे.