Allu Arjun’s First Look From AA22xA6: साऊथ सुपरस्टार (South Superstar) अल्लू अर्जुन (Allu Arjun) देशभरातली चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. अल्लू अर्जुनच्या आगामी सिनेमाचे चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. 'पुष्पा 2' (Pushpa 2) च्या जबरदस्त यशानंतर, सर्वांच्या नजरा आता अल्लू अर्जुनच्या नव्या प्रोजेक्टवर खिळल्या आहेत. अल्लू अर्जुन सुप्रसिद्ध दिग्दर्शक अॅटलीच्या 'AA22xA6' सिनेमात झळकणार आहे. सिनेमाचं शुटिंग केव्हा सुरू झालं असून नुकताच सिनेमाच्या सेटवरचा एक फोटो लीक झालेला. हा केवळ फोटो नाही, तर चाहत्यांसाठी पर्वणी आहे. या फोटोमधून अल्लू अर्जुनचा 'AA22xA6' मधला पहिला लूक समोर आला आहे.

Continues below advertisement


लीक झालेल्या फोटोमधला अल्लू अर्जुनचा लूक कसा? 


सोशल मीडियावर लीक झालेल्या एका फोटोमध्ये अल्लू अर्जुन अगदी वेगळ्या स्टाईलमध्ये दिसतोय. गेल्या काही वर्षांत अल्लू अर्जुन पुष्पा स्टाईल कॅरी करत होता. पण, आता आगामी सिनेमात तो वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. त्यामुळे लीक झालेल्या फोटोवरुन चाहते अल्लू अर्जुनच्या लूकबाबत अंदाज बांधत आहे. या फोटोमध्ये अल्लू अर्जुन काळ्या रंगाचा ट्रॅकसूट आणि बन घातलेला दिसतो, जो तो एका अ‍ॅक्शन सीनचं चित्रीकरण करत असल्याचं दर्शवतो. हा फोटो AA22xA6 च्या सेटवरील आहे की, इतर कुठचा, हे समजू शकलेलं नाही.






अॅटलीच्या 'AA22xA6'मध्ये अल्लू अर्जुनचा डबल रोल 


'AA22xA6'मध्ये अॅटली आणि अल्लू अर्जुन पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट एक अ‍ॅक्शन-एंटरटेनर असणार आहे. त्यामुळे या सिनेमात नक्कीच काहीतरी धमाकेदार पाहायला मिळणार, असा अंदाज चाहत्यांकडून बांधला जात आहे. असं बोललं जात होतं की,  'AA22xA6'मध्ये अल्लू अर्जुन डबल रोलमध्ये दिसणार आहे. त्यामुळेच या सिनेमाकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढलेल्या. पण, अल्लू अर्जुनच्या टीमनं अलिकडेच स्पष्ट केलं की, सुपरस्टार दुहेरी भूमिका साकारणार आहे, ज्यामुळे चित्रपटात अनेक ट्विस्ट असतील यात शंकाच नाही.


याआधी, अल्लू अर्जुननं एका मुलाखतीत बोलताना चित्रपटाबद्दल सांगितलं होतं की, "हो, हा माझा 22 वा चित्रपट आहे आणि मी 'जवान' सिनेमाचं दिग्दर्शन करणाऱ्या अ‍ॅटली गरूसोबत काम करतोय . त्यांनी मांडलेली कल्पना मला खूप आवडली. आम्हाला भारतीय चित्रपटसृष्टीत एक पूर्णपणे नवा आणि रोमांचक चित्रपट आणण्याची आशा आहे..."


दरम्यान, अ‍ॅटली दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहे. या वर्षी जूनमध्ये दीपिकानं सिनेमाचं शुटिंग सुरू केलं.  त्यावेळी निर्मात्यांनी तिचे स्वागत करणारा एक व्हिडीओ रिलीज केलेला. दीपिकाला साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Anurag Kashyap Vicky Kaushal Chhaava Movie: 'मला 'छावा' आवडला नाही...', विक्की कौशलच्या हिट सिनेमाबाबत अनुराग कश्यप यांचं मोठं वक्तव्य