Alibaba Aani Chalishitale Chor :  सध्या अनेक नव्या सिनेमांची पर्वणी प्रेक्षकांना मिळत आहे. हिंदीसह मराठीतही अनेक नवे सिनेमे सिनेमागृहात दाखल होत आहेत. त्यातच आता एक नवा कोरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) हीने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन तिच्या या नव्या सिनेमाविषयी माहिती दिली. अलीबाबा आणि चाळीशीतले चोर (Alibaba Aani Chalishitale Chor) असं या नव्या सिनेमाचं नाव आहे. येत्या 29 मार्चपासून हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होईल. 


या सिनेमात अभिनेत्री मुक्ता बर्वेसह, सुबोध भावे, अतुल परचुरे, आनंद इंगळे,मधुरा वेलणकर - साटम, उमेश कामत आणि श्रृती मराठेही झळकणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा आदित्य इंगळे यांनी सांभाळली आहे. नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृदगंध फिल्म्स एल. एल. पी.यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तसेच चित्रपटाची कथा विवेक बेळे यांनी लिहिली असून  नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलीये. 


सोशल मीडियावर प्रोमोला प्रतिसाद


अभिनेत्री मुक्ता बर्वे हीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या सिनेमाचा प्रोमो शेअर केला आहे. तसेच या प्रोमोला प्रेक्षकांनी देखील भरभरुन प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता या सिनेमाची नेमकी गोष्ट काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. मुक्ताने शेअर केलेल्या या प्रोमो चाहत्यांनी देखील बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत. 






साधारणपणे लग्नावर आधारित या सिनेमाची गोष्ट असल्याचं म्हटलं जात आहे. चाळीशीतल्या या लोकांना विवाहित असल्याचा गुन्हा केला आहे. आता या गुन्ह्याला काय शिक्षा मिळणार? नेमका विवाहित असण्याचा यांना कोणता गुन्हा केलाय? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले आहेत. प्रेक्षकांच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांना येत्या 29 मार्च रोजी सिनेमागृहात मिळणार आहेत. त्यामुळे या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता सध्या शिगेला पोहचली असल्याचं पाहायला मिळत आहे. 


ही बातमी वाचा : 


Manohar Joshi : दोन दिवसांपूर्वीच कास्टिंग, कधीही भेट नाही, वा बोलणंही नाही; तरिही रुपेरी पडद्यावर 'असे' साकारले गेले 'जोशी सर'