Planet Prediction March 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या मार्गक्रमणामुळे मार्च महिना खूप खास असणार आहे. मार्चमध्ये अनेक मोठे ग्रह राशी बदलणार आहेत. राशी परिवर्तनासह या महिन्यात अनेक ग्रहांची युती देखील होणार आहे, ज्यामुळे अनेक शुभ आणि अशुभ योगांची निर्मिती होईल. ज्योतिष शास्त्रानुसार, मार्च महिन्यात बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ ग्रह राशी बदलणार आहेत. त्यासह मार्च महिन्यात बुध (Budh) आणि शनीचा (Shani) उदयही होत आहे. मार्च (March) महिन्यात ग्रहांच्या स्थितीत होणाऱ्या बदलाचा काही राशींच्या (Zodiac Signs) लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होणार आहे, या काळात अनेक राशींचं नशीब उजळेल.


मार्च महिन्यात ग्रहांच्या स्थितीत महापरिवर्तन


ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह 7 मार्चला मीन राशीत प्रवेश करणार आहे, जिथे राहू ग्रह आधीपासून विराजमान आहे. अशा स्थितीत बुध आणि राहूची युती होणार आहे. यासोबतच, शुक्र सुद्धा 7 मार्चला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, जिथे शनि ग्रह आधीपासून विराजमान आहे. अशा स्थितीत सुमारे 30 वर्षांनी कुंभ राशीमध्ये शुक्र आणि शनीचा युती होणार आहे. त्याच बरोबर, सूर्यही कुंभ राशीत आहे. 14 मार्च रोजी ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत प्रवेश करणार असून, बुध ग्रहासह युती झाल्यामुळे बुधादित्य योग (Budhaditya Yog) तयार होत आहे. सूर्य आणि राहूच्या युतीमुळे ग्रहण (Grahan) योग तयार होत आहे. त्यानंतर 15 मार्चला बुध (Budh) मीन राशीत आणि 18 मार्चला शनि (Shani) कुंभ राशीत उदय होईल.


वृषभ रास (Taurus)


ग्रहांच्या या महापरिवर्तनाचा सकारात्मक परिणाम वृषभ राशीच्या लोकांवर पडणार आहे. या राशीच्या लोकांसाठी हे संपूर्ण वर्ष केवळ आनंद घेऊन येऊन येईल. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. या काळात तुमचा अध्यात्माकडे कल वाढेल, तुम्ही तीर्थयात्रेलाही जाऊ शकता. नोकरदारांनाही विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे, त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळेल. अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांनी या काळात असं करणं फायदेशीर ठरू शकतं. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतात. मार्च महिन्यात उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. या महिन्यात तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना लाभदायी ठरू शकतो. एकीकडे शनीचा उदय होत आहे, तर दुसरीकडे शनि, शुक्र आणि सूर्याची युती होत आहे आणि त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना खूप खास असणार आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर तुम्ही सहज मात कराल. यासह व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांनाही अनेक लाभ मिळतील, उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडतील. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, तसेच तुम्ही तुमच्या मुलांसोबत आनंदी राहाल. तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढेल. आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यामुळे तुम्ही बचतही करू शकता.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी मार्च महिना खूप चांगला जाणार आहे. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा एकदा सुरू होतील. तुम्हाला तुमच्या वडिलांचं संपूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. या काळात तुम्ही कुटुंबासह चांगला वेळ घालवाल. घरात अनेक दिवसांपासून सुरू असलेले वाद आता संपुष्टात येऊ शकतात. शुक्राच्या कृपेने तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा नावलौकीक वाढेल. तुम्ही घेतलेला निर्णय योग्य ठरेल. वैवाहिक जीवनासाठी हा महिना खूप चांगला असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Budh Gochar 2024 : बुध ग्रहामुळे दुहेरी राजयोगाची निर्मिती; 'या' राशीचे लोक होणार मालामाल, प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश