Alia Ranbir Wedding: आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) 14 तारखेला बैसाखीच्या मुहूर्तावर पती-पत्नी होणार आहेत. रणबीर आणि आलियाच्या लग्नाची तारीख जाहीर करताना, स्वतः आई नीतू कपूर यांनी मीडियाला ही माहिती दिली. हे लग्न रणबीर कपूरच्या घरी वास्तूमध्ये होणार आहे. पण, आता बातमी अशी आहे की, पंजाबी रितीरिवाजांनुसार होणाऱ्या या लग्नात वरातही काढण्यात येणार आहे.
‘कृष्णराज’ बंगल्यापासून वरात निघणार!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर आणि आलियाची वरात कृष्णा राज बंगल्यापासून सुरू होईल, जे रणबीर आणि आलियाचे नवीन घर आहे. कपूर कुटुंब या मिरवणुकीत सहभागी होणार आहे आणि संपूर्ण कपूर कुटुंब वास्तूपर्यंत नाचत-गात धमाल करत जाईल, जिथे आलिया आणि रणबीर सात फेरे घेतील. कपूर कुटुंबासाठी गुरुवार हा मोठा दिवस असून, त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
पार पडला हळद आणि मेहंदी सोहळा!
‘वास्तू’मध्येच आलिया आणि रणबीरचा हळदी आणि मेहंदी समारंभ पूर्ण विधींसह पार पडला आहे, ज्यामध्ये कपूर आणि भट्ट कुटुंबाने हजेरी लावली होती. याशिवाय आलिया आणि रणबीरच्या जवळच्या मित्रांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. करण जोहर, श्वेता बच्चन यांनी यावेळी हजेरी लावली होती. त्याच वेळी, अनेक सेलिब्रिटी देखील लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लग्नात करण जोहर, सैफ अली खान, अर्जुन कपूर, मसाबा गुप्ता, अयान मुखर्जी, झोया अख्तर, वरुण धवन, संजय लीला भन्साळी हे सहभागी होणार आहेत.
‘या’ दिवशी असणार रिसेप्शन!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नासाठी फक्त जवळच्या लोकांना आमंत्रित केले जाईल आणि त्यानंतर 17 एप्रिलला दोघेही रिसेप्शन देणार आहेत. हे रिसेप्शन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार असून, त्यात इंडस्ट्रीतील सर्व लोकांना आमंत्रित केले जाणार आहे. साऊथचे स्टार्सही या पार्टीत सहभागी होऊ शकतात, ज्यांच्यासोबत आलियाने काम केले आहे.
हेही वाचा :