Alia Ranbir Wedding : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री  आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा लग्न सोहळा लवकरच पार पडणार आहे. काल हळद आणि मेहंदी सोहळा पार पडला. आज रणबीर आणि आलिया हे लग्नबंधनात अडकणार आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आलिया आणि रणबीरला शुभेच्छा देत आहेत. आता नुकतीच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करून बिग बींनी आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. 


आलिया आणि रणबीरचा आगामी चित्रपट 'ब्रम्हास्त्र' मधील केसरिया या गाण्याचा टीझर व्हिडीओ शेअर करून बिग बींनी आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'आमचे ईशा आणि शिवा हे लवकरच नव्या प्रवासाला सुरूवात करणार आहेत. दोघांनाही पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. सेलिब्रेशनला सुरूवात करूयात. '





रणबीर आणि आलियाचा ब्रम्हास्त्र चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आलिया आणि रणबीर यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन हे या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. 


‘या’ दिवशी असणार रिसेप्शन!


मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नासाठी फक्त जवळच्या लोकांना आमंत्रित केले जाईल आणि त्यानंतर 17 एप्रिलला दोघेही रिसेप्शन देणार आहेत. हे रिसेप्शन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार असून, त्यात इंडस्ट्रीतील सर्व लोकांना आमंत्रित केले जाणार आहे. साऊथचे स्टार्सही या पार्टीत सहभागी होऊ शकतात, ज्यांच्यासोबत आलियाने काम केले आहे. 


हेही वाचा :