After Dhurandhar Akshaye Khanna Drastic Transformation In Mahakali: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' सिनेमात (Dhurandhar Movie) एका गँगस्टरची भूमिका साकारुन अक्षय खन्नानं (Akshaye Khanna) सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. अत्यंत कमी संवाद, पण फक्त डोळे आणि हावभाव यावर अक्षय खन्नानं 'धुरंधर'मधल्या रहमान डकैतची (Rehman Dakait) भूमिका पडद्यावर जिवंत केली. डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांना आठवण करून दिली की, अक्षय खन्ना अजूनही हिंदी चित्रपटसृष्टीतील (Hindi Film Industry) सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. अशातच आता 'धुरंधर'नंतर पुढे काय? अक्षय खन्ना कोणत्या भूमिकेत झळकणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पण, चिंता करु नका आता 'धुरंधर'नंतर अक्षय खन्ना नव्या सिनेमातून सर्वांच्या भेटीला येणार आहे. पण, या सिनेमात तो साकारणार असलेली भूमिका अत्यंत वेगळी असणार आहे.
अक्षय खन्नाच्या आगामी सिनेमाबाबत चर्चा रंगलेली असतानाच आता अक्षय खन्ना दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांचा ड्रीम प्रोजेक्ट 'महाकाली'मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा अक्षय खन्नाच्या एकूणच कारकिर्दीतला एक नाविण्यपूर्ण आणि पूर्णपणे वेगळा सिनेमा असणार आहे.
'महाकाली' सिनेमात अक्षय खन्ना साकारणार शुक्राचार्य (Akshaye Khanna As Shukracharya)
यापूर्वी बहुतेक वास्तववादी आणि अगदी साध्या भूमिका साकारणारा अक्षय खन्ना पहिल्यांदाच पौराणिक कथा आणि सुपरहिरोच्या जगात प्रवेश करत आहे. प्रशांत वर्मांनी सिनेमॅटिक विश्व 'हनुमान'सारख्या चित्रपटांनी आधीच स्वतःला स्थापित केलं आहे. अशातच त्यांच्या सिनेमात अक्षय खन्ना दिसणार म्हटल्यावर प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
चित्रपटाशी संबंधित एका सूत्रांनी सांगितलं की, "प्रशांत वर्मांना असा अभिनेता हवा होता, जो कोणत्याही आरडाओरडा केल्याशिवाय शांतपणे, आपल्या अभिनयानं संपूर्ण सेट आपल्या ताब्यात घेऊ शकेल, त्याच्या डोळ्यात रहस्य असेल, त्याच्या आवाजात वजन असेल आणि त्याच्या फक्त चालण्यानंच समोरच्याला कापरं भरेल. त्यांच्या डोक्यात आलेल्या या फिगरमध्ये अक्षय खन्ना परफेक्ट बसला..."
प्रशांत वर्मांच्या 'महाकाली' सिनेमात अक्षय खन्ना शुक्राचार्यांच्या रुपात
'महाकाली' सिनेमातला अक्षय खन्नाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. अक्षय खन्नाचा लूक पाहून 'महाकाली' सिनेमा हिट जाणार, हे जवळपास प्रेक्षकांनी ठरवूनच टाकलं आहे. 'महाकाली' चित्रपटातील अक्षय खन्नाच्या पहिल्या लूकनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. लांबसडक पांढरे केस, जाडजूड दाढी, काळे डोळे असलेला अक्षय शुक्राचार्यांच्या रुपात दिसतोय. त्याच्या डोळ्यांत जुनी चमक कायम आहे, पण यावेळी, त्यात एक अलौकिक खोली देखील दिसते.
सेटवरील एका कलाकारानं सांगितलंय की, "जेव्हा अक्षय खन्ना शुक्राचार्यांच्या रुपात, पूर्ण पोशाखात सेटवर आला, तेव्हा सर्वजण क्षणभर गप्प बसले. अनेकांनी अक्षय खन्नाला ओळखलंही नाही. त्याच्या केवळ उपस्थितीनं वातावरणात शांतता, एक आदरयुक्त भिती पसरली होती..."
जिकते, तिकडे चोहिकडे अक्षय खन्नाचीच चर्चा
अक्षय खन्ना नेहमीच जास्त सिनेमे करत नाही. तो सिनेमा निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवड करतो. 'धुरंधर'नं त्याला पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळवून दिली आणि 'महाकाली' त्याला अशा शैलीत घेऊन जातो, ज्यामध्ये तो यापूर्वी कधीही आला नव्हता. इथे, प्रेक्षकांना तो एका शांत अभिनेत्यापासून एका रहस्यमयी, मोठ्या आणि दैवी शक्तिशाली पात्रात रूपांतरित होताना दिसेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :