Horoscope Today 21 December 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 21 डिसेंबर 2025, आजचा वार रविवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज पौष मासारंभ होत आहे. मार्गशीर्ष महिना संपून पौष महिन्याची सुरूवात होतेय. त्यामुळे आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज घरातील सर्वांनाच घर सजवण्यामध्ये आनंद वाटेल, घरातील वातावरणही आनंदी उत्साही राहील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज स्थावर इस्टेटची कामे मार्गी लागतील, नवीन घर ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी विचार करायला हरकत नाही
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज प्रकृतीला जपायला हवे, जुने मित्र-मैत्रिणी भेटतील, दुसऱ्याला सहकार्य करण्यात तत्पर राहाल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज प्रसिद्धीच्या झोतात याल, लेखकांच्या लेखन शैलीमध्ये एक वेगळाच अविष्कार दिसेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज महिला आपल्या वागणुकीने सर्वांना जिंकून घेतील, तुमच्या वागण्यामध्ये कल्पकता व दृष्टेपणा चांगला राहील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज तुमच्या अंगी असलेल्या कलेचा अविष्कार इतरांना बघायला मिळेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज तुम्ही जसे बोलाल तसे वागल्यामुळे तुम्हाला मान मिळेल, गुढ गोष्टींबद्दल आकर्षण वाटेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज अति भावनाप्रधान हवी, थोड्या मोडी स्वभावामुळे इतरांना गोंधळत टाकाल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज ज्या परिस्थितीत असाल त्याचा परिणाम जरा जास्तच मनावर होऊ शकतो, जोडीदाराचे आरोग्य सांभाळावे लागेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज थोड्या थोड्या गैरसमजामुळे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात, व्यवसायात हातात घेतलेली कामे पूर्णत्वाला जाणार नाहीत
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज महिलांनी आर्थिक फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी, दुसऱ्याच्या मनातील भावना ताबडतोब ओळखाल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आर्थिक इच्छा पूर्ण झाल्या नाही तरी आवश्यक तेवढा पैसा निश्चित हातात पडेल.
हेही वाचा
Weekly Lucky Zodiac Signs: शेवटचा आठवडा...डबल लाभ..पुढचे 7 दिवस 5 राशींची प्रगती दुप्पट! पॉवरफुल वरिष्ठ योग, कोण मालामाल होणार? पैसा, नोकरी, प्रेम...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)