Avatar Fire and Ash Collection: बॉक्स ऑफिसवर सध्या ‘धुरंधर’चं (Dhurandhar) वर्चस्व पाहायला मिळत आहे. 15 दिवसांत या चित्रपटाचा वर्ल्डवाइड कलेक्शन 700 कोटींवर पोहोचला असून लवकरच देशांतर्गत 500 कोटींचा टप्पाही पार होण्याची शक्यता आहे. मात्र, 19 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या एका नव्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसची समीकरणं बदलली आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 500 कोटींची कमाई करत भारतात 20 कोटींचा आकडा गाठला आहे. हा चित्रपट म्हणजे जेम्स कॅमरून यांची बहुप्रतिक्षित हॉलीवूड फ्रँचाइज- ‘अवतार: फायर अँड एश’(Avatar Fire and Ash). ‘धुरंधर’चा जोरदार गाजावाजा सुरू असतानाही हॉलीवूडची ‘अवतार: फायर अँड एश’ बॉक्स ऑफिसवर थेट भिडली आहे. भारतात या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 20 कोटींचा टप्पा पार केला आहे.
जेम्सच्या चित्रपटाचा पहिला भाग 'अवतार' आणि दुसरा भाग 'अवतार: द वे ऑफ वॉटर' म्हणून प्रदर्शित झाला. आता, त्याच्या तिसऱ्या भागाचं नाव 'अवतार: फायर अँड अॅश' असं आहे. तिसऱ्या सिक्वेलमध्ये पाहण्यासारखं बरंच काही आहे. उत्तम सीन्ससह, VFX चा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे चित्रपटाचा प्रत्येक सीन धमाकेदार बनतो. 'अवतार'चा ट्रेलर म्हणजे, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा उत्तम नमुनाय. प्रत्येक सीनपासून ते अगदी बारीक-सारीक डिटेल्सपर्यंत सगळं काही धमाकेदार आहे.
बॉक्स ऑफिसवर धुरंधरला टक्कर
जेम्स कॅमरूनची ‘अवतार’ फ्रँचाइज 19 डिसेंबर 2025 रोजी वर्ल्डवाइड रिलीज झाली. बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कनुसार, भारतात या चित्रपटाने ओपनिंग डे ला 20 कोटींचा गल्ला जमवला, तर जागतिक स्तरावर कमाई 500 कोटींवर पोहोचली. याचदरम्यान ‘धुरंधर’ने 15व्या दिवशी 22 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे ‘धुरंधर’च्या गोंगाटातही ‘अवतार: फायर अँड एश’ने बॉक्स ऑफिसवर यशस्वी एंट्री घेतली आहे.
‘अवतार: फायर अँड एश’ भारतात इंग्लिश, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा सहा भाषांमध्ये रिलीज झाला आहे. पहिल्याच दिवशी इंग्लिश आवृत्तीतून 9 कोटी, हिंदीतून 5.5 कोटींची कमाई झाली. तेलुगूमध्ये 2.85 कोटी, तमिळमध्ये 2.6 कोटी, कन्नडमध्ये 8 लाख तर मल्याळममध्ये 2 लाखांची कमाई चित्रपटाने केली आहे. विशेष म्हणजे, ‘अवतार: फायर अँड एश’ची ओपनिंग ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’पेक्षा कमी आहे. 2022 मध्ये रिलीज झालेल्या ‘द वे ऑफ वॉटर’ने भारतात 40.3 कोटींची ओपनिंग केली होती आणि पहिल्याच वीकेंडला 128.8 कोटींचा गल्ला जमवला होता. आता ‘धुरंधर’च्या जोरदार कमाईदरम्यान ‘अवतार: फायर अँड एश’ हे आकडे पार करू शकते का, हे पाहणं औतुक्याचं ठरणार आहे.