Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बच्चन पांडे(Bachchan Pandey) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची टीम सध्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे.  अक्षयनं नुकताच सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय फोनवर एका मुलीसोबत खास गप्पा मारताना दिसत आहे. दिप्ती असं या मुलीचं नाव आहे.  चित्रपटाचं प्रमोशन करण्याची अक्षयची ही हटके पद्धत नेटकऱ्यांच्या पसंतीस पडली. 

Continues below advertisement


अक्षयनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तो सोलापूरमधील दिप्तीला फोन करतो. दिप्तीनं अक्षयला सांगितलं की ती सोलापूरची आहे. मग अक्षयनं तिच्यासोबत मराठी भाषेत बोलायला सुरूवात केली. दिप्तीनं अक्षयला सांगितलं की, ती शासकीय परीक्षेची तयारी करत आहे. हे ऐकल्यानंतर अक्षयनं दिप्लीला परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आणि परिक्षा झाल्यानंतर बच्चन पांडे चित्रपट पाहण्यास सांगितले. दोघांमधील या संवादाचा व्हिडीओ अक्षयनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


अक्षयची पोस्ट-






बच्चन पांडे हा चित्रपट 18 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये चित्रपटात अक्षय कुमारसोबतच अभिनेत्री कृती सेनन  जॅकलिन फर्नांडिस   आणि अभिनेता अरशद वारसी  हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha