एक्स्प्लोर

एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर 'महाराष्ट्र' सिनेमात पहिला सीन कोणता असेल? अक्षयचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांचं अभिमानास्पद उत्तर!

Akshay Kumar Taking Interview CM Devendra Fadnavis: अक्षय कुमारनं विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावणारं उत्तर दिलं.

Akshay Kumar Taking Interview CM Devendra Fadnavis: बॉलिवूडचा (Bollywood News) खिलाडी कुमार अक्षय कुमारनं (Akshay Kumar) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis) यांची मुलाखत घेतली. 'महाराष्ट्र आणि सिनेमा - भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेचे भविष्य' घडवण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली.  यावेळी अक्षय कुमारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जर तुम्ही एका दिवसासाठी दिग्दर्शक झालात तर, पहिला सीन काय शूट कराल? असा प्रश्न विचारलं. यावेळी क्षणाचाही विलंब न लावता देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावणारं उत्तर दिलं. नेमकं देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत? सविस्तर पाहूयात... 

अभिनेता अक्षय कुमारनं देवेंद्र फडणवीसांना विचारलं की, असा कोणता सिनेमा आहे, ज्यांनं तुम्हाला राजकीय दृष्टीकोनातून भूरळ घातलीय...? यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पाहा ज्यावेळी तुम्हाला सिनेमा भूरळ घालतो किंवा काही शिकवतो, ते आपल्या संवेदना आणि मनाला प्रभावितकरतो... तसं अनेक फिल्म्सनी मला प्रभाविक केलीय... पण, जर राजकारणाविषयी बोलायचं झालं तर, एक फिल्म आहे, ज्याचा मी इथे नक्कीच उल्लेख करिन, त्या फिल्मनं मला प्रभावित केलंच, पण त्या फिल्मनं माझ्यासाठी एवढ्या समस्या वाढवल्या... ती फिल्म आहे, 'नायक'... या फिल्ममध्ये अनिल कपूर एका दिवसाचे मुख्यमंत्री बनून दिवसभरात एवढी कामं करतात की, मी जिथे कुठे जातो, तिथे लोक मला सांगतात की, 'नायक' सारखं काम करा... एका दिवसात त्यांनी किती काय-काय केलं... कसं एकाच दिवसांत त्यांनी सगळंच बदललं... 

"मला एक दिवस अनिल कपूर भेटले त्यावेळी मी त्यांना म्हटलं की, तुम्हा का बनवलीय नायक? तुम्ही 'नायक' आणि आम्ही 'नालायक'... एकाच दिवसांत तु्म्ही एवढ्या गोष्टी कशा केल्या? मला असं वाटतं की, एक बेंचमार्क सेट करण्याचं काम त्यांनी केलंय... पण चित्रपटांनी, एक माणूस म्हणून माझ्या संवेदना जागृत केल्यात. अनेकदा असं होतं की, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही एखादं काम सारखं-सारखं केलं की, तुमचे इमोशन्स थोडे कमी होतात... पण ते इमोशन्स जिवंत ठेवण्याचं काम फिल्म्सनी केलंय... मी असं मानतो की, फिल्म पाहिल्यानंतर मी एक सर्वसामान्य माणूस बनतो... जो मी कित्येक वर्षांपासून आहे...", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर... देवेंद्र फडणवीस म्हणाले...

अक्षय कुमारं विचारलं की, नायक फिल्ममध्ये जसं अनिल कपूर एक दिवसाचे मुख्यमंत्री बनतात, तसं जर तुम्हाला एक दिवसासाठी दिग्दर्शक बनवलं आणि फिल्मचं नाव महाराष्ट्र असेल, तर तुम्ही पहिला सीन काय दिग्दर्शित कराल? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जर महाराष्ट्रावर फिल्म बनत असेल तर, पहिला सीन असेल छत्रपती शिवाजी महाराज... राज्याभिषेकासाठी सिंहासनावर आरुढ झाले असतील आणि इतक्या वर्षांच्या गुलामगिरीनंतर पुन्हा एकदा स्वराज्याचा निर्माण हाच त्या सिनेमाचा पहिला सीन असेल..."

पाहा व्हिडीओ : CM Devendra Fadnavis Interview | अक्षय कुमारचे प्रश्न, मुख्यमंत्री फडणवीसांची दिलखुलास उत्तरे

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Devendra Fadnavis & Akshay Kumar: मोदींना विचारलं आंबा कसा खाता? ट्रोल होऊनही अक्षय कुमारने फडणवीसांना पुन्हा तोच प्रश्न विचारला, म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Zee Marathis Popular Serials: झी मराठीवरील 3 मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; 'सनई चौघडे', 'कमळी' अन् 'तारिणी'त रंगणार नवा थरार
झी मराठीवरील 3 मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; 'सनई चौघडे', 'कमळी' अन् 'तारिणी'त रंगणार नवा थरार
Shraddha Kapoor Eetha: 'ईठा' सिनेमात 'द केरळ स्टोरी 2' फेम अभिनेत्रीची एन्ट्री; श्रद्धा कपूरसोबत नृत्याचा जलवा दाखवणार, कोण आहे ती?
'ईठा' सिनेमात 'द केरळ स्टोरी 2' फेम अभिनेत्रीची एन्ट्री; श्रद्धा कपूरसोबत नृत्याचा जलवा दाखवणार, कोण आहे ती?
Urfi Javed Screenshots: 'हॉट'स्टार उर्फी जावेदनं धर्म बदलला? रिता भारद्वाज असं नाव ठेवलं? अखेर सत्य समोर, स्क्रिनशॉट्स शेअर करत म्हणाली..
'हॉट'स्टार उर्फी जावेदनं धर्म बदलला? रिता भारद्वाज असं नाव ठेवलं? अखेर सत्य समोर, स्क्रिनशॉट्स शेअर करत म्हणाली..
Shreyas Talpade On Shah Rukh Khan: श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन, शाहरुख खानची एक सही अन् बँकेची मंजुरी, फराह खाननंही केलेला फोन
श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन, शाहरुख खानची एक सही अन् बँकेची मंजुरी, फराह खाननंही केलेला फोन

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Lohgarh Fort: केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
Eknath Shinde on Uddhav Thackeray: आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा 'दे धक्का', म्हणाले काही...
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे
Embed widget