एक्स्प्लोर

Akshay Kumar: अक्षय कुमारनं केलं डोळ्याचं ऑपरेशन; बॉलिवूडचा खिलाडी घेणार कामातून ब्रेक; पुढचे 5 सिनेमे पेंडिंग

Akshay Kumar Eye Surgery: त्याचा अलीकडेच प्रदर्शित झालेला ' भूत बंगला ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत असल्याने अक्षय चर्चेत आहे.

Akshay Kumar Eye Surgery: बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार कायम त्याच्या नव्या प्रोजेक्टमुळे चर्चेत असतो. वर्षभरात साधारण तीन ते चार चित्रपट करणारा अक्षयने सध्या काही दिवसांचा ब्रेक घेतलाय. कारण आहे त्याच्या शस्त्रक्रियेचं. अभिनेता अक्षय कुमारने नुकतीच त्याच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. अनिस बज्मी यांच्या आगामी चित्रपटाचं केरळ मधील शूटिंग पूर्ण केल्यानंतर आता तो आराम करणार असल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान,  त्याचा अलीकडेच प्रदर्शित झालेला ' भूत बंगला ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत असल्याने अक्षय चर्चेत आहे.

अक्षय कुमारने केलं डोळ्यांचं ऑपरेशन

2026 हे वर्ष अक्षय कुमारसाठी आत्तापर्यंत बरंच व्यस्त होतं. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या भूत बंगला या हिट चित्रपटानंतर तो दिग्दर्शक अनिस बज्मी यांच्या आगामी चित्रपटाचा शूटिंग करत होता. या जास्त वेळापत्रकातून वेळ काढत अक्षयने डोळ्यांचे शस्त्रक्रिया केली आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, 6 मे रोजी सकाळी त्याची शस्त्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी करण्यात आली होती. केरळ मधील शूटिंग पूर्ण केल्यानंतर तो आता काही दिवस विश्रांती घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अक्षयला गेल्या काही दिवसांपासून डोळ्याचा थोडा त्रास जाणवत होता. 6 मे रोजी सकाळी मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात त्याचे शस्त्रक्रिया पार पडली.

5 चित्रपट आहेत लाईनअपमध्ये..

अनिस बजनी यांच्या या आगामी चित्रपटात अक्षय सोबत विद्या बालन आणि राशी खन्ना प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपटही एक कॉमेडी ड्रामा असून त्याचं नाव अद्याप जाहीर झालेलं नाही. विद्या बालन आणि अक्षय कुमार यांनी आधी 'भुलभुलैया' आणि 'मिशन मंगल' यासारख्या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.  अक्षय कुमारचा आगामी प्रोजेक्ट बद्दल बोलायचं झालं तर त्याच्याकडे 'वेलकम टू द जंगल', 'हैवान', 'गोलमाल 5' आणि मराठी चित्रपट 'वेडात मराठे वीर दौडले सात' हे प्रोजेक्ट लाईन अप आहेत. दरम्यान अक्षय कुमारचा अलीकडेच प्रदर्शित झालेला हॉरर कॉमेडी चित्रपट भूत बंगला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटात परेश रावल,राजपाल यादव, वामिका गब्बी, मिथिला पालकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा टप्पा पार करेल अशी शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
OTT trending Movie: OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
Sayaji Shinde On Omraje Nimbalkar: ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Embed widget