एक्स्प्लोर

Akshay Kumar and Shilpa Shetty: अक्षय कुमार अन् शिल्पा शेट्टी लग्न करणार होते? मग बिनसलं कुठं? चित्रपट निर्मात्याने उलगडला भूतकाळ

Akshay Kumar and Shilpa Shetty: अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांचं नात लग्नाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलं होतं.

Akshay Kumar and Shilpa Shetty Relationship: अक्षय कुमार (Akshay kumar) आणि शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty). एकेकाळी ही जोडी प्रचंड फेमस होती.  दोघांचे एकत्रित अनेक पिक्चर ब्लॉकबस्टरवर हिट झाले. या दोघांवर चित्रित केलेली गाणी आजही त्यांचे चाहते आवर्जून ऐकतात.   पण तुम्हाला ठाऊक आहे का, केवळ सिनेमांमध्ये नव्हे तर, खऱ्या आयुष्यातही पार्टनर होणार होते.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार आणि शिल्पा हे सिरिअस रिलेशनशिपमध्ये (Relationship) होते.  दोघांच्या रिलेशनशिपची प्रचंड चर्चा झाली होती. एक वेळ अशी होती, जेव्हा दोघांचे लग्न जवळजवळ निश्चित झाले होते.  मात्र, तेव्हा असं काहीतरी घडलं, ज्यामुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. फिल्ममेकर सुनील दर्शन यांनी अक्षय आणि शिल्पा दोघांच्या विभक्त होण्यामागचं कारण सांगितलं.   दोघांमध्ये नेमकं काय बिनसलं? दोघांचं नातं संपु्ष्टात येण्यापर्यंत का पोहोचलं? यामागचा खुलासा फिल्ममेकर सुनील दर्शन यांनी केला आहे.

अक्षय कुमार अन् शिल्पा शेट्टी सिरिअस रिलेशनशिपमध्ये होते? (Akshay Kumar and Shilpa Shetty Were Almost Married)

Times Entertaimentच्या वृ्तानुसार, Minutes ऑफ मसालाशी चर्चा करताना सुनील दर्शन यांनी सांगितलं की, 'त्यावेळी अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांचे रिलेशनशिप खूप चांगले चालले होते.   मला तेव्हा जवळजवळ असं वाटलं होतं की, दोघांचं लग्न हे निश्चित आहे.  पण तेव्हा असं काही घडलं की, दोघांचं लग्न होऊ शकलेलं नाही.  दोघांमधील गैरसमज वाढत गेले.  या गैरसमजामुळे  त्यांचे ब्रेकअप झाले'. सुनील दर्शन यांनी सांगितले की, 'अक्षय कुमारचे सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत होते.  त्यामुळे त्याला काम मिळणे कठीण झाले होते'. सुनील यांनी 1999 साली अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीसोबत फिल्म 'जानवर'ची निर्मिती केली.  हा सिनेमा अक्षय कुमारच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला. 

'जानवर' हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी अक्षय कुमारचे  अनेक चित्रपट एकापोठपाठ एक  फ्लॉप झाले होते.  1996 साली रिलीज झालेला 'सपूत',  1997 साली रिलीज झालेला 'लहू के दो रंग', 'इन्साफ द फायनल जस्टिस', 'दावा',  यांसारखे त्याचे चित्रपट फ्लॉप झाले.  सुनील दर्शन यांनी सांगितले की,  यानंतर अक्षय कुमारचा 'जानवर' हा सिनेमा जबरदस्त  बॉक्स ऑफिसवर चालला.   या सिनेमामुळे अक्षय कुमारला मोठे स्टारडम मिळाले.  यानंतर अक्षय कुमारने मागे वळून पाहिलं नाही. 'हेरा फेरी' आणि 'धडकन'  यांसारख्या सिनेमातून अक्षय कुमारने कमबॅक केलं.   25 वर्षांत अक्षयच्या कारकि‍र्दीचा आलेख कायम चढताच राहिला. सुनील दर्शन आणि अक्षय कुमारने एकत्रित अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

अक्षय कुमारच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत बोलायचं झाल्यास,   अक्षयचा आगामी 'हैवान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  प्रियदर्शन दिग्दर्शित या  सिनेमात सैफ अली खान याचीही महत्त्वाची भूमिका आहे. तब्बल 17 वर्षांनंतर दोघेही एकत्र स्क्रिनवर झळकणार आहे. या सिनेमात अक्षय आणि सैफ अली खान व्यतिरिक्त  बोमण इराणी, शरीब हाश्मी, सैयामी खेर आणि श्रिया पिळगावकर  यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  हा सिनेमा 11 सप्टेंबर 2026 रोजी रिलीज होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मराठी कलाकार का नको?, आधी 50 टक्के पैसे दिले, नंतर थेट येऊ नको बोलले...; छोटा पुढारीसोबत मुंबईतील दहीहंडीत नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Box Office Collection : 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर महाविक्रम! अवघ्या 17 दिवसांत 900 कोटींचा टप्पा पार करणार; 'बाहुबली 2'लाही टाकणार मागे
'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर महाविक्रम! अवघ्या 17 दिवसांत 900 कोटींचा टप्पा पार करणार; 'बाहुबली 2'लाही टाकणार मागे
Ajinkya Dev On Maherchi Sadi Sequel : 'माहेरची साडी' पुन्हा मोठ्या पडद्यावर येणार? अलका कुबल यांच्या जागी 'या' अभिनेत्रीला अजिंक्य देव यांची पसंती!
'माहेरची साडी' पुन्हा मोठ्या पडद्यावर येणार? अलका कुबल यांच्या जागी 'या' अभिनेत्रीला अजिंक्य देव यांची पसंती!
Rising Summit 2026 : 'दबंग'चा सिक्वेल कन्फर्म; 'बजरंगी भाईजान'चाही पार्ट 2 येणार का? एबीपीच्या कार्यक्रमात सलमान खानने सांगून टाकलं, म्हणाला...
'दबंग'चा सिक्वेल कन्फर्म; 'बजरंगी भाईजान'चाही पार्ट 2 येणार का? एबीपीच्या कार्यक्रमात सलमान खानने सांगून टाकलं, म्हणाला...
Rising Summit 2026 : सलमान खानने श्रद्धा कपूरला फोन करून मागितली माफी! म्हणाला, 'I am Sorry' 'मला आधी माहीत असतं तर...' नेमकं काय घडलं?
सलमान खानने श्रद्धा कपूरला फोन करून मागितली माफी! म्हणाला, 'I am Sorry' 'मला आधी माहीत असतं तर...' नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
PMC Recruitment Scam : पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
US Report China Pakistan : अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती जीवावर बेतली; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती जीवावर बेतली; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Gokul : गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
Kolhapur Crime News: शाळेतील पुस्तक घेऊन बोलावलं, डोळ्यांवर पट्टी बांधून मिठाईचं आमिष दाखवलं; नराधम चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार
शाळेतील पुस्तक घेऊन बोलावलं, डोळ्यांवर पट्टी बांधून मिठाईचं आमिष दाखवलं; नराधम चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार
Embed widget