एक्स्प्लोर

Ajay Devgns Juhu Bungalow BMC Notice: अजय देवगणच्या अडचणीत वाढ, सोसायटीच्या तक्रारीनंतर BMCने धाडली नोटीस; नेमकं प्रकरण काय?

Ajay Devgns Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यातील नेमकं प्रकरण काय? BMCने स्टॉप वर्क नोटीस का पाठवली?

Ajay Devgn on BMC Notice: अजय देवगणचा (Ajay Devgn) बंगला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण चर्चेत येण्यामागचं कारण वेगळं आहे.  'कपोळ को - ऑपरेटिव्ह हाउसिंग  सोसायटी'मध्ये  अजय देवगणच्या बंगल्यावर सलून अन् स्पाबाबत बीएमसीने (BMC) 'काम थांबवण्याची नोटीस' (Stop Work Notice) बजावली आहे.  या जागेचा वापर करण्यासाठी 'के वेस्ट'विभागाने कोणतीही परवानगी दिलेली नाही, असं पालिकनं स्पष्ट केलंय.  दरम्यान, हाऊसिंग सोसायटीकडून आलेल्या तक्रारीनंतर, अधिकाऱ्यांनी मालमत्ता मालकांकडे  कागदपत्रे  मागवली होती. त्यानंतर ही नोटीस बजावली आहे. माहितीनुसार, देवगण कुटुंबाने यावर उत्तर देण्यासाठी 4 आठवड्यांचा कालावधी मागितला आहे. 

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, देवगण कुटुंबाने कपोळ को- ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील आपली एक मालमत्ता चालवण्यासाठी भाड्याने दिली होती. यामुळे रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  कपोळ सोसायटीने देवगण कुटुंबाला पत्र लिहून कागदपत्रे सादर करण्याची विनंती केली होती. ज्यावरुन ही जागा स्पा अन् सलूनसाठी कायदेशीररित्या वापरता येऊ शकते, हे सिद्ध होईल. पण देवगण टीमकडून कोणतेही प्रतिसाद मिळाले नाही, असं सोसायटीच्या म्हणण्यांनुसार स्पष्ट झालंय.

सोसायटीच्या तक्रारीनंतर अजय देवगणच्या अडचणीत वाढ (Ajay Devgns Juhu Bungalow Gets BMC Stop Work Notice)

दरम्यान, आवश्यक असलेले सर्व परवानग्या मिळवण्यात आल्या, असं देवगण कुटुंबाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.  हे प्रकरण को-ऑपरेटिव्ह डिपार्टमेंटपर्यंत गेले असून,    जिथे  डेप्युटी रजिस्टर फैयाज मुलाणी यांनी तक्रारीच्या आधारावर कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, देवगण टीमनेही कारवाईच्या संदर्भात मुदत मागितली असल्याची माहिती समोर आली आहे. के - वेस्टच्या  वॉर्डच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'के वेस्ट वॉर्डने S-10  परिसराच्या व्यवसायिक वापरासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. यासंदर्भात सोसाटीकडून तक्रार प्राप्त झाली. तक्रारीच्या आधारावर मालकांकडून कागदपत्रे मागवण्यात आली, पण कागदपत्रे सादर करण्यात आलेली नाही. त्यामुळे  काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली', असं  त्यांनी स्पष्ट केलं.

कपोळ सोसायटीचा आक्षेप मालमत्ता भाड्याने देण्याबाबत नसून, व्यावसायिक वापराबाबत आहे. सोसायटीचे म्हणणे आहे की, ही सोसायटी पूर्णपणे निवासी सोसायटी आहे.  यावेळी त्यांनी, नागरी आणि कायदेशीर परवानग्यांव्यतिरिक्त या बंगल्याचा वापर इतर कारणांसाठी केला जाऊ शकतो का?   असा प्रश्न उपस्थित केला. देवगणच्या टीममधील चीफ लीगल आणि  कंपल्यांस ऑफिसर रुचि कनोजिया यांनी सांगितले की, 'जागेच्या प्रस्तावित वापराबाबतच्या आवश्यक परवानग्या आणि मंजुरी संबधित अधिकाऱ्यांकडून रितसर घेण्यात आले आहे', असं त्यांनी स्पष्ट केलं.

सोसायटीने बीएमसीला स्ट्रक्चरल काम,प्लंबिंग, इलेक्ट्रिकल सिस्टम, HVAC, एक्सेस, पार्किंगस साइनेज आणि फायर सेफ्टी  यांच्याशी संबंधित परवानग्यांचीही पडताळणी करण्यास सांगितले आहे. यात कोणतेही पोस्ट फॅक्ट्रो अप्रुव्हल विचारात घेण्यापूर्वी आपले मत मांडण्याची संधी मिळावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अनुराग कश्यप म्हणतात की, 'भारत ऑस्करसाठी चुकीचे चित्रपट निवडतो'; 'गोंधळ'चे दिग्दर्शक म्हणाले, 'अभिप्राय देण्यापूर्वी सिनेमा पाहा'

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Daddy Cool Song : 15 वर्षांनंतर शाहरुख-करीनाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर; ‘डॅडी कूल’मधील धमाकेदार डान्सने घातला धुमाकूळ!
15 वर्षांनंतर शाहरुख-करीनाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर; ‘डॅडी कूल’मधील धमाकेदार डान्सने घातला धुमाकूळ!
Ramayana Box Office Collection : 'धुरंधर 2'ला टक्कर देत 'रामायण'ची ऐतिहासिक झेप! 1000 कोटींचा आकडा पार, बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम
'धुरंधर 2'ला टक्कर देत 'रामायण'ची ऐतिहासिक झेप! 1000 कोटींचा आकडा पार, बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम
Ajay Purkar : 'हे अत्यंत फालतू लोक, घाणेरडे चित्रपट बनवायची, यांची वृत्ती...'; अजय पुरकरांनी अनुराग कश्यपला सुनावलं
'हे अत्यंत फालतू लोक, घाणेरडे चित्रपट बनवायची, यांची वृत्ती...'; अजय पुरकरांनी अनुराग कश्यपला सुनावलं
Rohit Pawar On Ramayana: डिलिमेटशनच्या मुद्द्यावरुन 'महाभारत' घडत असताना रोहित पवार 'रामायण' चित्रपट पाहायला गेले, बाहेर पडताच सूचक पोस्ट, म्हणाले...
डिलिमेटशनच्या मुद्द्यावरुन 'महाभारत' घडत असताना रोहित पवार 'रामायण' चित्रपट पाहायला गेले, बाहेर पडताच सूचक पोस्ट, म्हणाले...
Advertisement

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Nilesh Lanke on Delimitation Bill : इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
Embed widget