Drishyam 3 Review By Ajay Devgn: 'दृश्यम 2' पेक्षा 'दृश्यम 3'...', अजय देवगणनंच केला रिव्यू, सिनेमा पाहायचा की नाही? स्वतःच्याच सिनेमाबाबत सगळं सांगून टाकलं
Drishyam 3 Review By Ajay Devgn: 'दृश्यम 3' रिलीज झाला असून त्याची मोठी क्रेझ पाहायला मिळतेय. अशातच हा सिनेमा कसा आहे? 'दृश्यम 2' पेक्षा चांगला आहे की वाईट? यावर स्वतः अजय देवगणनं भाष्य केलंय.

Drishyam 3 Review By Ajay Devgn: अजय देवगणचा (Ajay Devgn) 'दृश्यम: द कन्क्लुजन' (Drishyam: The Conclusion) म्हणजेच, 'दृश्यम 3' (Drishyam 3) रिलीज झालाय. गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते या सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत होते. 'दृश्यम: द कन्क्लुजन'ला दमदार प्रतिसाद मिळतोय. यावेळी अजय देवगणसोबत जयदीप अहलावत, प्रकाश राज, तब्बू आणि कमलेश सावंत हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. बॉलिवूडमधील सगळ्यात गाजलेल्या 'दृश्यम' या सस्पेन्स थ्रिलर फ्रँचायझीचा 'दृश्यम 3' हा तिसरा आणि शेवटचा भाग आहे. या सिनेमातून अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'दृश्यम 2'नंतर पुढे काय घडणार? याबाबत चाहते उत्सुक आहेत. पण, त्यासोबतच 'दृश्यम 2' पेक्षा 'दृश्यम 3' दमदार असेल का? असा प्रश्नही चाहत्यांना पडलाय. आता याचं उत्तर सिनेमाचा मुख्य अभिनेता अजय देवगण (Actor Ajay Devgn) यानंच सर्वांना दिलंय. अजय देवगणनं मोजक्याच शब्दांत 'दृश्यम 3'चा रिव्यू केलाय.
अजय देवगण मुंबईतील FICCI फ्रेम्स 2026च्या इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्यानं त्याचा सिनेमा 'दृश्यम: द कन्क्लुजन'चा थोडक्या रिव्यू केला. त्यानं प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तरच देऊन टाकलंय. अजय देवगण 'दृश्यम 3'बाबत नेमकं काय म्हणालाय? सविस्तर जाणून घेऊयात...
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण नेमकं काय म्हणाला? (Ajay Devgn On Drishyam 3)
अजय देवगण 'दृश्यम 3'बाबत बोलताना म्हणाला की, "हा कथेचा शेवट आहे. विजय साळगावकरला पोलीस हरवतात की, तो स्वत: हरतो...? हे पाहण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. हा शेवटचा भाग आहे, कारण 'दृश्यम'सारख्या सिनेमांची कथा लिहिणं फार अवघड आहे. आम्हाला याचा शेवट खूप उत्कृष्ट पद्धतीनं करायचाय. ज्याप्रकारे सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली गेलीय. मला वाटतं की, असाच याचा शेवट असू शकतो. मी मंगळवारी हा सिनेमा पाहिला आणि 'दृश्यम २' पेक्षा 'दृश्यम 3' चांगला आहे, असं मी म्हणेन..."
मतभेद असल्यामुळे 'दृश्यम' फ्रँचायजीचा शेवट होतोय, असं म्हटलं जातंय, या प्रश्नावर बोलताना अजय देवगण म्हणाला की, "असं अजिबात नाही. कोणतेच मतभेद नाहीत. 'दृश्यम'सारख्या सिनेमाचा सीक्वल बनवणं सोपी गोष्ट नाही. कथा लिहिणं फार कठीण आहे. कथा लिहिताना मर्यादा येतात. जिथे आधीच्या कथेचा शेवट झाला, तिथूनच कथा पुढे घेऊन जावी लागते. तुम्ही नवीन मर्डर मिस्ट्री दाखवू शकत नाही. किंवा ते कुठल्या तरी दुसऱ्या प्रसंगात अडकलेत असंही दाखवता येत नाही..."
दरम्यान, अजय देवगणचा सिनेमा 'दृश्यम' हा मूळचा साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या सिनेमाचा रिमेक होता. 'दृश्यम' बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला, या सिनेमानं ब्लॉकबस्टर कमाई केली. त्यानंतर या सिनेमाचा दुसरा पार्टही आला. आणि आज 2 ऑक्टोबरला या सिनेमाचा तिसरा पार्ट 'दृश्यम 3' रिलीज करण्यात आलाय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Before You Go
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha




















