एक्स्प्लोर

Ajay Devgan BMC Notice: अजय देवगणला BMC ची नोटीस, जुहू बंगल्याचं काम रोखण्याचे आदेश,16 लाखांचं भाडं, सलून स्पाची तयारी अन्...; नेमका वाद काय?

या तक्रारीनंतर BMCच्या K-West वॉर्डने प्रॉपर्टी मालकांकडून आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या मागवल्या.

Ajay Devgan BMC Notice: अजय देवगणच्या (Ajay Devgan) मुंबईतील जुहू बंगल्याशी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) या प्रॉपर्टीवर सुरू असलेल्या कामाला ‘काम थांबवा’ नोटीस बजावली आहे. या बंगल्याचा व्यावसायिक वापर करण्यासाठी सलून आणि स्पाशी संबंधित प्रस्तावित काम सुरू होतं. मात्र, या वापरासाठी आवश्यक परवानग्या आणि कागदपत्रे सादर न केल्याने BMCने काम थांबवण्याचे निर्देश दिल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, देवगण कुटुंबाने नोटीसला उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे.

नेमका काय आहे हा वाद?

अजय देवगणचा हा बंगला मुंबईतील जुहू परिसरातील JVPD स्कीममध्ये आहे. ही सुमारे 7,802 स्क्वेअर फूटची प्रॉपर्टी आहे. या बंगल्याच्या व्यावसायिक वापरावरून हा वाद निर्माण झाला आहे. कपोल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीकडून या प्रॉपर्टीबाबत BMCकडे तक्रार करण्यात आली होती. प्रस्तावित सलून आणि स्पामुळे परिसरात ग्राहकांची ये-जा वाढेल, पार्किंगची समस्या निर्माण होईल, सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि आवाजाचा त्रास होऊ शकतो, अशी रहिवाशांची चिंता असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, परिसरातील अंतर्गत रस्ते अरुंद असल्यामुळे रहिवाशांनी या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं आहे. या तक्रारीनंतर BMCच्या K-West वॉर्डने प्रॉपर्टी मालकांकडून आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या मागवल्या. मात्र, प्रस्तावित व्यावसायिक वापरासाठी आवश्यक मंजुरीची कागदपत्रे सादर न झाल्याने काम थांबवण्याची नोटीस देण्यात आली.

देवगण कुटुंबाचा काय दावा?

दुसरीकडे, देवगण कॅम्पमधील सूत्रांनी वेगळा दावा केला आहे. प्रॉपर्टीच्या प्रस्तावित वापरासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक परवानग्या आणि मंजुरी योग्य पद्धतीने घेण्यात आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. ही प्रॉपर्टी 10 ऑगस्ट रोजी झालेल्या रजिस्टर्ड लीव्ह-अँड-लायसन्स करारानुसार Florian Hurel Salons Private Limited या कंपनीला देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याच ठिकाणी सॅलून आणि स्पा सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचं समोर आलं आहे.

दरमहा 16 लाख रुपये भाडं?

‘मुंबई मिरर’च्या रिपोर्टनुसार, हा करार 5 वर्षांसाठी करण्यात आला आहे. कराराच्या पहिल्या वर्षात या प्रॉपर्टीसाठी दरमहा 16 लाख रुपये भाडं निश्चित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर दरवर्षी भाड्यात वाढ होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य मुद्दा प्रॉपर्टी भाड्याने दिली आहे की नाही हा नसून, या बंगल्याचा व्यावसायिक वापर करण्यासाठी आवश्यक कायदेशीर परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, हा आहे. आता देवगण कुटुंबाकडून सादर करण्यात येणारी कागदपत्रे आणि संबंधित परवानग्यांची छाननी झाल्यानंतर या प्रकरणाचं पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या या प्रॉपर्टीवरील काम थांबलेलं आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Daddy Cool Song : 15 वर्षांनंतर शाहरुख-करीनाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर; ‘डॅडी कूल’मधील धमाकेदार डान्सने घातला धुमाकूळ!
15 वर्षांनंतर शाहरुख-करीनाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर; ‘डॅडी कूल’मधील धमाकेदार डान्सने घातला धुमाकूळ!
Ramayana Box Office Collection : 'धुरंधर 2'ला टक्कर देत 'रामायण'ची ऐतिहासिक झेप! 1000 कोटींचा आकडा पार, बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम
'धुरंधर 2'ला टक्कर देत 'रामायण'ची ऐतिहासिक झेप! 1000 कोटींचा आकडा पार, बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम
Ajay Purkar : 'हे अत्यंत फालतू लोक, घाणेरडे चित्रपट बनवायची, यांची वृत्ती...'; अजय पुरकरांनी अनुराग कश्यपला सुनावलं
'हे अत्यंत फालतू लोक, घाणेरडे चित्रपट बनवायची, यांची वृत्ती...'; अजय पुरकरांनी अनुराग कश्यपला सुनावलं
Rohit Pawar On Ramayana: डिलिमेटशनच्या मुद्द्यावरुन 'महाभारत' घडत असताना रोहित पवार 'रामायण' चित्रपट पाहायला गेले, बाहेर पडताच सूचक पोस्ट, म्हणाले...
डिलिमेटशनच्या मुद्द्यावरुन 'महाभारत' घडत असताना रोहित पवार 'रामायण' चित्रपट पाहायला गेले, बाहेर पडताच सूचक पोस्ट, म्हणाले...
Advertisement

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Nilesh Lanke on Delimitation Bill : इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
Embed widget