Drishyam 3 Marathi Actress: अजय देवगणच्या 'दृश्यम 3'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा जलवा; पोलिसाची भूमिका साकारली, शूटिंगचा अनुभव केला शेअर
Marathi Actress in Drishyam 3: मराठी अभिनेत्री नेहा जोशीची 'दृश्यम 3'मध्ये महत्त्वाची भूमिका.

Drishyam 3 Marathi Actress: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'दृश्यम 3' (Drishyam 3) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या सिनेमाचे ट्रेलर पाहून अनेकांनी हा चित्रपट पाहण्याची उत्सुक दर्शवली. 'सॅम' या पात्राचा मृतदेह नेमकं कुठे लपवलं आहे? याचा शोध पोलिसांकडून सुरू असतो. 'दृश्यम' या फ्रँचायझीच्या दोन्ही पार्टला प्रेक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. तिसऱ्या पार्टलाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. अवघ्या दोन दिवसांत 'दृश्यम 3' या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा ओलांडला. रविवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 61 कोटी रुपयांची (Box Office Collection) कमाई केली. या सिनेमात जबरदस्त कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. अजय देवगण (Ajay Devgan) व्यतिरिक्त या सिनेमात काही मराठी कलाकारही झळकले आहेत. अभिनेत्रीने (Neha Joshi) नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे अभिनेत्रीने 'दृश्यम 3'मध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
नेहा जोशी 'दृश्यम 3'मध्ये झळकली, अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल (Ajay Devgans Drishyam 3 Marathi Actress Neha Joshi)
View this post on Instagram
'दृश्यम' या सिनेमाच्या फ्रँचायझीमध्ये लोकप्रिया मराठी अभिनेत्री हिची महत्त्वाची भूमिका आहे. त्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं नाव नेहा जोशी असं आहे. ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री 'दृश्यम 3'मध्येही झळकली आहे. माहितीनुसार, मराठी अभिनेत्री नेहा जोशी हिने जेनी थॉमस ही व्यक्तीरेखा साकारली आहे. तिने या सिनेमात Assistant Sub inspector ही व्यक्तीरेखा साकारली आहे. मीरा (तब्बू)च्या सांगण्यावरुन जेनी साळगांवकर कुटुंबावर लक्ष ठेवून असते. साळगांवकरांच्या घरात घडत असलेल्या गोष्टी जेनी मिराकडे शेअर करत असते. जेनी थॉमस बारकाईने आणि अगदी हुशारीने विजयच्या घरावर लक्ष ठेवून असते.
नेही जोशीने 'दृश्यम 3' या सिनेमात Assistant Sub inspector ही भूमिका साकारली असून, तिसऱ्या भागातही कोर्टाच्या सीक्वेन्समध्ये तिचे सीन्स आहेत. अभिनेत्रीने नुकतीच पोस्ट शेअर करुन दिग्गज कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव सांगितला. तिने पोलीस गणवेशातील फोटोस आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. अभिनेत्रीने मिरर सेल्फी शेअर केला आहे. फोटोस शेअर करत अभिनेत्रीने लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. 'Assistant Sub inspector, जेनी थॉमस रिपोर्टिंग...'दृश्यम 3' मध्ये या दिग्गज कलाकारांसोबत पुन्हा एकदा काम करण्याचा, एक अद्भुत शिकण्याचा अनुभव मिळाला' . असं म्हणत तिने अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, जयदिप अहलावत, प्रकाश राज या दिग्गज कलाकारांना टॅग केलं आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून, तिच्या चाहत्यांनीही अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर मराठी कलाकारांनीही कमेंट करुन नेहा जोशीचं कौतुक केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















