Weekly Horoscope 17 To 23 February 2025 : आजपासून फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. हा आठवडा काही राशींसाठी भाग्याचा तर काही राशींसाठी तोट्याचा असणार आहे. तसेच, ग्रहांची स्थिती नेमकी कशी असेल, याचा कोणत्या राशींवर कसा परिणाम होईल? याच संदर्भात जाणून घेऊयात साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscoep).
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असेल. विविध स्त्रोतांमधून तुमच्याकडे धनलाभ होईल. तेसच, मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमची मानसिक स्थिती चांगली असणार आहे. फक्त कोणाला त्यावर नियंत्रण करण्याचा हक्क देऊ नका.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असणार आहे. नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. या आठवड्यात समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, तुमची दानशूर वृत्तीदेखील दिसून येईल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असणार आहे.
तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, लवकरच तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. त्यामुळे तुमचं मन फार प्रसन्न असणार आहे. मात्र, तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमचं मन फार चिंतेत असेल.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजपासून सुरु झालेला आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या काळात धनलाभाचे योग जरी असले तरी पैशांच्या बाबतीत तुम्ही सावध असणं गरजेचं आहे. तसेच, तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळ. या आठवड्यात तुमच्यावर लक्ष ठेवणाऱ्यांची संख्याही वाढलेली आहे.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवजा चांगला असणार आहे. आठवड्याची सुरुवात काहीशी आव्हानात्मक असू शकते. मात्र, जसजसे दिवस जातील तसतशी परिस्थिती नियंत्रणात राहील. तुमचं भाग्य उजळेल. तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्याता कोणतीही जोखीम हाती घेऊ नका. तसेच, आवश्यक असेल तरच नवीन वस्तूंची खरेदी करा. मुलांच्या बाबतीत अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, आरोग्याचीही काळजी घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुम्हाला तुमच्या पार्टनरचा चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, तुमच्याकडून चांगली गुंतवणूक देखील केली जाईल. या काळात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. मात्र, या आठवड्यात कोणतीही जोखीम हाती घेऊ नका. तसेच, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मित्रांकडून एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. फक्त पैशांच्या बाबतीत तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. या आठवड्यात तुमच्या आरोग्याच्या बाबतीतही तुम्ही सतर्क असायला हवं. आठवड्याच्या शेवटी तरुणांना चांगली बातमी ऐकायला मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला ना लाभ ना तोटा होणार आहे. तसेच, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. या काळात तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या फिटनेसकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. एकूणच तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काम पूर्ण करु शकता.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सतर्कतेचा असणार आहे. या आठवड्यात धनलाभाचे देखील संकेत जुळून येणार आहेत. तसेच, जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला करिअरमध्ये अनेक प्रगतीच्या संधी मिळतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :